प्रेस फोटोग्राफर अमोल भांबरकर यांना मातृशोक!

अहमदनगर दि. १३ मार्च (प्रतिनिधी)
अहमदनगर शहरातील नगर-कल्याण रोडवरील भ्रुंगऋषी गृहनिर्माण सोसायटी येथील गणेश नगर येथील रहीवासी श्रीम. द्रोपदी बबनराव भांबरकर यांचे नुकतेच आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते. विश्वहिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मिडिया प्रमुख व फोटोग्राफर अमोल बबनराव भांबरकर तसेच राज्य परिवहन महामंडळ अकोलेचे एस.टी. चालक सतिश बबनराव भांबरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. पूर्वी हे कुटुंब झारेकर गल्ली येथे राहात होते. तसेच त्या वहीणी नावाने सुपरीचीत होत्या.
अंतयात्रा गणेशनगर येथील रहात्या घरुन सायंकाळी ७ वाजता निघेल अमरधाम नालेगाव येथे त्यांचेवर अंत्य संस्कार करण्यात येईल.