गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगनाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

अहमदनगर दि.१० मार्च (प्रतिनिधी) गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगनाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.या कारवाईची आधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधिक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब,
यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा एक इसम श्रीरामपुर तालुक्यातील निमगांव खैरी गांवातील हॉटेल गितगंगा जवळ येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, पोना/शंकर चौधरी, सचिन आडबल, संदीप दरदंले, राहुल सोळुंके व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी श्रीरामपुर तालुक्यातील, श्रीरामपूर-पुणतांबा रोडवरील, निमगांव खैरी गांवातील हॉटेल गितगंगा येथे जावून सापळा लावुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसला. पथकाची खात्री होताच पथकाने संशयीतास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंके, वय 23, रा. घायगांव, ता. वैजापुर, जिल्हा औरंगाबाद हल्ली रा. निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक (01) गावठी बनावटीचा कट्टा व दोन (02) जिवंत काडतूस मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले व सदर गावठी कट्टा व जिवंत काडतुस कोठुन आणले या बाबत विचारपुस करता तो सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने सदर गावठी कट्टा व जिवंत काडतुस हे 2) प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर यांचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. त्याचा दिले पत्त्यावर जावुन शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
सदर इसम निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर परिसरात एक (01) गावठी कट्टा व दोन (02) जिवंत काडतूस असा एकूण 31,000/- रु. किं.चा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोना/376 शंकर संपत चौधरी ने. स्थागुशा यांनी श्रीरामपूर तालुका पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 134/2023 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपूर तालुका पोस्टे करीत आहे.
आरोपी नामे प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर आर्म ऍ़क्ट, गुन्ह्याचा कट करणे व माहिती लपविणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 2 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपूर तालुका 83/2014 भादविक 457, 380
2. श्रीरामपूर तालुका 92/2014 भादविक 399, 402
3. नारायणगांव, जिल्हा पुणे 52/2016 भादविक 395, 392
4. श्रीरामपूर तालुका 113/2018 भादविक 399, 402, 353
5. श्रीरामपूर तालुका 39/2018 भादविक 399, 402
6. श्रीरामपूर तालुका 85/2018 भादविक 387, 504, 506
7. श्रीरामपूर शहर 145/2018 भादविक 399, 402
8. श्रीरामपूर शहर 1922/2020 भादविक 399, 402
9. श्रीरामपूर तालुका 210/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
10. श्रीरामपूर तालुका 134/2023 आर्म ऍ़क्ट 3/25
आरोपी नामे प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 10 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. कोपरगांव 189/2016 भादविक 224, 225, 120 (ब), 212
2. श्रीरामपूर तालुका 134/2023 आर्म ऍ़क्ट 3/25
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संदीप मिटके साहेब, उविपोअ श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.