भोसे येथे मद्यधुंद सरपंचपती अमोल रोहिदास खराडे व इतर आठ ते दहा गावगुंडांकडून श्री संत बाळूमामा मंदिर परिसराचे नुकसान!

भोसे दि. १० मार्च (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील भोसे येथे 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 च्या दरम्यान *दारूच्या नशेत* सरपंच पती अमोल रोहिदास खराडे ट्रॅक्टर ड्रायव्हर काकासाहेब नाना क्षिरसागर यांनी राजकीय सूड बुद्धीने हुकूमशाही पद्धतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती दिवशी जाणीवपूर्वक जातीय दंगल घडऊन आणण्यासाठी बाळूमामा मंदिासमोरील बाळू मामांचे फोटो असलेली पाटी तोडून बाळू मामांच्या फोटोंची केली विटंबना व वृक्षांना केलेले कंपाऊंडची तोडफोड,शिवीगाळ, दादागिरी,जीवघेणा हमला ,मारहाण तसेच पोलिस तक्रार केली म्हणून त्याच दिवशी रात्रभर अतुल बाळु खराडे, शंकर नवनाथ खराडे,महेश मोहन थोरात, अनिकेत गंगाधरे, काकासाहेब नाना क्षिरसागर, परशुराम सुरेश ढोले, गणेश बापुराव खराडे, तानाजी थोरात,शुभम वाल्मीक थोरात, विकास निवृत्ती खराडे, दादा दिलीप खराडे व इतर इसमांनी दरोडा टाकण्याच्या हेतुने घराभोवती घातल्या घिरट्या व हात पाय तोडण्याची दिली धमकी.
सदरच्या फिर्यादीनुसार अमोल रोहिदास खराडे यांच्यावर भादवी कलम ३२३, ५०४ आणि ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विकास चंदन हे करीत आहे. सदर घटनेतील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.
अमोल खराडे हे सरपंचाचे पती असून गावातील बलाढ्य आहेत. त्यामुळे त्याची गावात दहशत असून ते आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप दिगंबर ढोले यांनी केला असून याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.