पिंपरखेड /फक्राबाद (प्रतिनिधी आदेश ओमासे )जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील मारुती मंदिर बाजारतळ येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ओमसाई हार्डवेअरचे उदघाटन कर्जत, जामखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी जामखेड पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, विजयसिहं गोलेकर, विलास शिंदे, अरुण गाडेकर सर, पांडुरंग ढवळे, पाराजी ढवळे, बाप्पू कार्ले, दिगम्बर ढवळे, अजिनाथ ढोले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार रोहितदादा पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी ओमसाई हार्डवेअरचे मालक सचिन ढोले यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार रोहितदादा पवार यांनी बाजारात फिरून शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेत, समस्या जाणून घेतल्या व त्यांचे प्रश्न सोडविण्याची हमी दिली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा