कामरगाव येथील युवतीच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या तीन आरोपींना अटक-नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)-१६ ऑक्टोंबर
आरोपींनी युवतीला धमकी दिली होती की पैसे नाही दिले तर युवतीला उचलून नेऊ
आरोपींना मा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामरगाव ता. जि अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या तीन आरोपींना नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी अटक केले.
सविस्तर वृत्त असे कि सविता बाळू गुंजाळ वय 32 वर्ष धंदा मजुरी र कामरगाव ता जि अनगर यांनी नगर तालुका पोलिसात फिर्याद दिली होती की 1) चेरमन आकल्या भोसले (2) शिला चेरमन भोसले 3) हरि काळे असे कामाला येत असत माझे पती हे गवंडी असून वरील त्यांचे कडे मजुरी कामास येत होते. दिनांक- 15/10/2022 सकाळी 07:00 या चे सुमारास घरी असताना घरी सुरेखा हरि काळे आली पती यांना शिवीगाळ करून कामाचे पैसे मागू लागली तेव्हा फिर्यादी व मुलगी दिक्षा घराचे बाहेर आलो तेव्हा सुरेखा काळे शिवगाळ करून कामाचे पैसे मागू लागली तेव्हा पती तिस म्हणाले कि तुझ्या नव-याचे कामाचे पैसे मी वेळोवेळी दिले आहेत तिस असे म्हणाल्याचा राग आल्याने तिने फिर्यादी व मुलगी हि म्हणाली कि तुम्ही पैसे दिले नाहीतर तुझी मुली दिक्षा हिस उचलून घेऊन जाईल तेव्हा तुम्ही पैसे देताल असा आरोपींनी दम दिला होता.
कामरगाव गावचा आठवडा बाजार असल्याने बाजार करण्यासाठी सकाळी 09/30 या चे सुमारास असता तेथे 1) चेरमन आकल्या भोसले 2) शिला चेरमन भोसले असे गावात ए.डी. सीसी बँकेसमोर कामरगाव येथे भेटले तेव्हा ते व पती यांना शिवीगाळ करू लागले व कामाचे पैसे मागू लागले तेव्हा पती म्हणाले की तुमचे कामाचे पैसे दिलेले आहेत असे म्हणाल्याचा राग 1) चेरमन आकल्या भोसले 2) शिला चेरमन भोसले यांना राग आल्याने त्यांनी पती यांना शिवीगाळ करून गाडी खाली जाऊन मेले तरी पैसे आम्ही वसूल करणार अशी दमबाजी केली होती.
फिर्यादी ह्या सायंकाळी 05/00 वा चे सुमारास घराचा दरवाजा बंद होता तो वाजवला असता मुलगी दिशा हिने दरवाजा उघडला नाही तेव्हा पती आमचे शेजारी राहणारे संदीप रामचंद्र गुंजाळ, रणजित नागेश गुंजाळ, किरण पवन येताळ असे यांनी दार तोडून आत गेलो असता घराचे मागिल खोलीत मुलगी दिक्षा हिने पत्र्याचे अँगलला ओढणी बांधून गळफास घेतलेला होता त्यांनंतर तीस खाली घेऊन उपचार कामी हॉस्पीटल येथे नेले तेव्हा डॉक्टरांनी तपासून औषधोपचारापुर्वीच मुलगी दिक्षा हिस मयत घोषीत केले.
अशी फिर्याद नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती गुन्हा घडल्यानंतर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व पुढील तपासासाठी एक पथक तयार करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस नगर तालुका पोलीस करत आहेत.
तिन्ही आरोपींनी फिर्यादी यांचे पती बाळू गुंजाळ व मुलगी दिशा गुंजाळ यांना शिवीगाळ दमदाटी व तुम्ही जर पैसे दिले नाहीत तर तुमची मुलगी दिक्षा हिस उचलून घेऊन जाईल तेव्हा तुम्ही पैसे देताल असे आरोपी म्हणाले होते घरी गेल्यानंतर सदरची घटना मुलगी दिक्षा हिस सांगितल्याने तिने त्या गोष्टीचे टेन्शन घेतले. त्यांनतर सकाळी 10.00 वा चे सुमारास कामावर निघून गेल्यानंतर मुलगी दिक्षा हिने गळफास घेऊन आत्महात्या केली होती
नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोना संभाजी बोराडे,पोना राहुल शिंदे,पोहेकॉ राजु ससाने,गणेश लबडे,पोना शिवाजी माने,पोकॉ विशाल टकले,राजु खेडकर, पोहेकॉ देवा काळे. या कर्मचाऱ्यांच्या पथकाने आरोपींना शनिवारी रात्री उशिरापिंपळगाव कौडा ता जि अनगर 1) चेरमन आकल्या भोराले 2) शिला चेरमन भोसले 3) सुरेखा हरि काळे सर्व रा. पिंपळगाव कौडा ता जि अनगर या आरोपींना अटक केली त्यांना आज रोजी कोर्टासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन पाठवले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.