अधिकारी नागरिकांना न्याय देण्याऐवजी देतात उडवा उडवीचे उत्तरे : जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंग घारू बाराबाभळी येथील पाणीपुरवठा प्रश्न, कचरा प्रश्न व रस्ते दुरुस्त करा अन्यथा येत्या पंधरा दिवसात आक्रमक भूमिका घेऊ दलित महासंघाच्या वतीने घटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी

अहमदनगर दि. ७ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : नगर तालुक्यातील बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीत असलेले प्रा. क्र.२.. नगर महेशनगर या ठिकाणी गेले अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली जाते, तरीही येथील रहिवाशांना पाणी, रस्ता व कचराकुंडी या सुविधा नाहीत. येथील रहिवाशांनी ग्रामपंचायतमध्ये वारंवार तक्रार करून तेथील ग्रामपंचायत दखल घेत नाही. तरीही आपण आमच्या समस्थ ग्रामस्थांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा परंतु १५ दिवसांपर्यंत यावर विचार झाला नाही तर बाराबाभळी येथील सर्व महिला हंडा मोर्चा आपल्या कार्यालयासमोर प्रदर्शित करण्यात येईल.
बाराबाभळी येथील पाणीपुरवठा प्रश्न, कचरा प्रश्न व रस्ते दुरुस्त करा दलित महासंघाच्या वतीने पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंग घारू,जिल्हा महिला अध्यक्ष अरूनाताई कांबळे,भिंगार शहराध्यक्ष प्रवीण कुमार जाधव, सुरज उमाप, स्नेहल खिळे, कीर्ती चव्हाण, पंडित मॅडम,अंजली राजगुरू,आशा म्हस्के, अनुसया कदम,छाया शेलार, सरस्वती कांबळे, सोनाली भोसले, सुनिता गायकवाड, मनीषा शिंदे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
******
दलित महासंघ युवक जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंग घारू
गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात गेलो असता व उडवा उडवी चे उत्तर देऊन महिलांना हकलून लावण्यात आले व सर्व ग्रामस्थ महिला न्याय मागण्यासाठी गेले असता न्याय मिळत नाही अशावेळी ग्रामस्थांनी व महिलांनी कोणाकडे जावा प्रशासन जर ग्रामस्थांना हकलून लावते तर ग्रामस्थांनी काय करावे.