जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाच्या वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहक वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, विजय मिसाळ, राहुल शिवशरण, बापूसाहेब वाघमोडे, सुधाकर खरात, बी.जी लांडगे, विकास जठर, दत्तात्रेय गवळी, एस.पी कसबे, दत्तात्रेय गायके, सौरव जाधव, माणिक निकम, शिवाजी देवकर, विजय दराडे, सय्यद फिरोज, पंकज खपके, सोमा येवले, संभा चव्हाण, जेम्स ससाने, बाबासाहेब नाईक, शंकर जाधव, अनिल हिगडे, अनिल गायकवाड, सुभाष नाईक, किरण गोरे, काशिनाथ नरवडे, साहेबराव थोरात, विनोद घुले आदीसह रुग्णवाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अधिकाराखाली असणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी 102 रुग्णवाहिका वाहन चालकांचे मागील सहा महिन्याचे थकीत वेतन कंत्राट दाराकडे बाकी आहे नगरमध्ये जिल्हा परिषदेचे जवळपास 98 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यासाठी 98 रुग्णवाहिका कार्यरत असून त्यावर तेवढेच कंत्राटी वाहन चालक कार्यरत आहेत. पूर्वीच्या कंत्राकदाराने ( मे.अष्टविनायक ट्रॅव्हल्स व ईश्वर ट्रॅव्हल्स ) यांनी देखील वाहन चालकांचे तीन महिन्याचे वेतन थकीत ठेवलेले असल्याने, वाहन चालकांना अनियमितपणे केलेले वेतन आणि वाहन चालकांच्या वेतनात केलेल्या तिरंगाईमुळे आपल्या विभागाने त्याला हटवून नवीन ठेकेदाराची नेमणूक केली.ज्यामुळे या 98 वाहन चालकांचे व्यवस्थित व वेळेत वेतन मिळेल असे आपले अनुमान होते,परंतु या नव्याने कंत्राट दिलेल्या (मे.दृष्टी सिक्युरिटी व प्रसनल सर्विसेस जळगाव व विंसोल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे )या कंपनीने देखील पूर्वीच्या कंत्राटदारा प्रमाणेच वाहनचालकांच्या वेतनात दिरंगाई करून त्यांची पिळवणूक केलेली असल्याने, सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या वाहन चालकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे दैनंदिन गरज भागवण्याचे मोठे आव्हान वाहन चालकांन समोर उभे राहिले आहे. मागील आठवड्यात आम्ही याच प्रश्नावर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांची भेट घेतल्याने कंत्राटधारा मार्फत वाहन चालकांच्या खात्यावर 11 हजार रुपये मासिक एवढे वेतन जमा केले .परंतु वाहनचालकांचे मागील दोन महिन्याचे राहिलेले वेतन सध्याच्या कंत्राकदाराकडे तसेच पूर्वीच्या कंत्राटदाराकडे तीन महिन्याचे असे एकूण पाच महिन्याचे वेतन सर्व वाहन चालकांचे थकीत आहे.त्याचप्रमाणे वाहन चालकांचा पीएफओ आणि विमा देखील कंत्राट दाराने भरलेला नसल्याने,उद्या कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्या साठी सर्वस्वी कंत्राटदार आणि आपले प्रशासन जबाबदार असेल,याची नोंद घ्यावी. महोदय,या सर्व वाहन चालकांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना काळात सर्वसामान्यांची रात्रंदिवस सेवा केली परंतु आज त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ केवळ ही केवळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व कंत्राटदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळेच आली आहे.
जिल्हा परिषदेच्या नियमानुसार शासनाकडून कंत्राटदाराला काही अटी घातलेल्या असतात त्यानुसार जिल्हा परिषदेकडे निधीचा अभाव असताना देखील कंत्राटदाराने सर्व वाहनचालकांचे वेळेवर वेतन अदा करणे बंधनकारक आहे,परंतु त्याच नियमाचा भंग संबंधित कंत्राट वाहनचालक संस्थेकडून होत असल्याने त्या कंत्राकदारावर कायदेशीर कारवाई करून मागील पाच महिन्याचे सर्व वाहनचालकांचे वेतन तत्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले अन्यथा सर्व वाहन चालकास घेऊन संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.