गुन्हेगारी

दरोडा,खून,मोक्का व इतर गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या!

एलसीबीची दणकेबाज कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) दरोडा,खूप, मोक्का, व इतर गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात स्थनिक गुन्हे शाखेला यश आले आहे.या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की नेवासा तालुक्यातील चांदा लोहारावाडी
रस्त्यावरील कर्डीले वस्तीवर दोन मार्च चोरी करण्याच्या उद्देशाने तीन जणांच्या टोळीने नवनाथ कर्डीले यांच्या घरातील महिलांच्या अंगावरील दागिने चोरून नेत असतांना चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या ओमकार कर्डिले याच्यावर धारदार शास्त्राने वार करून चोरटे पळून गेले होते. या चोरट्यांच्या मारहाणीत ओंकार कर्डिले या तरुणाचा मृत्यू झाला होता.
नवनाथ ज्ञानदेव कर्डीले यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भादविक ३०२, ३९४, ३९७ प्रमाणे जबरी चोरी आणि खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात अली होते.
या घटनेचे पडसाद नेवासा तालुक्यात उमटले होते ग्रामस्थांनी चांदा गाव एक दिवसासाठी बंद ठेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती तर आरोपी पकडला गेला नाही तर बेमुदत बंद करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी बाबा खान उर्फ शिवाजी भोसले हा कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरात एका विटभट्टीवर काम करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी भोसले याला ताब्यात घेऊन नेवासे पोलिसांच्या हवाली केले आहे बाबा खान याने या गुन्ह्याची कबुली दिली असून बाब खान उर्फ शिवाजी भोसले याच्यावर मोक्या सह श्रीरामपूर, नेवासा,शनीशिंगणापूर येथे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे चार गुन्हयात तो फरारी होता.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके
सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, संदीप पवार, संदीप घोडके, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रवि सोनटक्के, संदीप दरदंले, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप चव्हाण लक्ष्मण खोकले, पोकॉ/सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, मयुर गायकवाड, विनोद मासाळकर, रणजीत जाधव, मच्छिद्र बर्डे, विजय धनेधर, योगेश सातपुते, चापोहेकॉ/ उमाकांत गावडे, संभाजी कोतकर, अर्जुन बडे व चापोना/भरत बुधवंत यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे