शिक्षकांना न्याय न दिल्यास इंग्रजी माध्यमांचीही गुणवत्ता ढासाळेल~ अविनाश पवार

पारनेर (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हासह राज्यात सध्या शिक्षण,स्कील असुन सुद्धा तरुण तरुणी बेरोजगार आहेत डी एड,बी एड तरुण; तरुणी;मोठ्या संख्येने नोकरीच्या शोधात आहेत शासनाने शिक्षक भरती करून यांना नोकरी द्यायला हवी नाहीतर सुशिक्षित बेरोजगार भत्ता तरी चालु करावा आज राज्यभरात एक भयंकर विदारक गोष्ट समोर येत आहे सुशिक्षित होतकरू गुणवंत शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर शोशन होते आहे यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या संबंधात ठराविक लोकांशी वार्ता लाप करुन माहिती घेतली असता इंग्रजी माध्यमाच्या खाजगी संस्थानी मनमानी पध्दतीने शिक्षणाच्या, फॅसिलीटीच्या,मुलभुत सोयी सुविधाच्या नावाने, विद्यार्थीनच्या कडुन मनमानी फी आकारुन आपल्या संस्थांच्या टोलेजंग इमारती उभारणी करुन संबंधित संस्था चालक मालेमाल झाले आहेत संस्थेची जाहिरात बाजी करत आपली संस्था कशी चांगली यासाठी पारनेर तालुक्यासह जिल्हात संस्था ची चढा ओढ चाललेली आपणास पहायला मिळत आहे पण महत्वाचा मुद्दा हा आहे की त्याबदल्यात संस्था आपल्या संस्थेत कामं करणार्या शिक्षकांना मोबदला देतात का यावर कोणीच संस्था चालक तसेच राजकीय नेता तोंडातुन ब्र शब्द काढायला तयार नाही ..? ज्या प्रकारे मनमानी फी वसुल करुन संस्था टोलेजंग इमारती उभ्या करतात त्या पध्दतीने संस्थेत विद्यार्थी घडविण्यासाठी कामं करणार्या व संबंधित संस्था जडण घडणीसाठी संस्थेचे नाव मोठे करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे महिला,पुरुष शिक्षकांना कामाचा मोबदला देतात का…? या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खाजगी शिक्षकांन कडुन माहिती घेतली असता खुप गंभीर विषय समोर आले शिक्षकांना कसल्याही प्रकारची फॅसिलीटी नाही विमा संरक्षण नाही ,कामाचे तास सुद्धा निच्छीत नाहीत, पी एफ नाही ,राहण्यासाठी किंवा येण्या जाण्यासाठी भत्ता नाही हाॅस्पीटल सुविधा नाही,रजा सुद्धा पगारी नाही सगळ्यात महत्वाची व गंभीर गोष्ट म्हणजे मिळणारा पगार आॅन रेकॉर्ड वेगळा आणि दिला जाणारा पगार सुद्धा वेगळा आहे त्यामुळे यावर गांभीर्याने विचार करुन शिक्षकांचे शोषण करुन शासन नियमानुसार किमान वेतन द्यायला ज्या संस्था चाल ढकल करत आहे अशा संस्थाची मान्यता रद्द करण्यात यायला हवी या संदर्भात लवकरच मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही पवार यांनी प्रसार माध्यमांना सागितले.
चौकट __ पद पैसा प्रतिष्ठा यासाठी हापापलेल्या पुढाऱ्यांना इंग्रजी माध्यमांकडून शिक्षकांचे होणारे शोषण दिसत नाही का? यांना आपल्या संस्था महत्वाच्या आहेत आज शिक्षकांना उच्च शिक्षण घेवून खाजगी संस्थेत काम करावे लागत ही मोठी शोकांतिका असून एवढे शिक्षण घेवून गुणवत्ता देवून न्याय मिळत नसेल तर डीएड बीएडच्या संस्थां बंद झालेल्या उत्तम राहील अन्यथा संस्थाचालकांना भेटून जाब विचारला जाईल न ऐकल्यास राज दरबारात प्रश्न उभा करून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांचे शोषण थांबवणार~ अविनाश पवार