केडगावला गढुळ पाणी आल्याने नगरसेवक विजय पठारे आक्रमक स्वतः विजय पठारे यांनी अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याच्या मुख्य टाकीची केली पाहणी

अहमदनगर (प्रतिनिधी) -दोन दिवसापासून जनतेला नळाद्वारे गढूळ तसेच मैला मिश्रीत पाणी येत आहे याचे प्रमुख कारण जरी प्रशासन बायपासची मुख्य जलवाहिनी शिफ्टिंग चे दाखवत असले तरी ही जलवाहिनी शिफ्ट होऊन दोन दिवस उलटले आहे तरी देखील गढूळ पाण्याचे प्रमाण कमी झाले नसून नळाद्वारे येत आहे या पाण्यामुळे केडगावकर अक्षरशः उलटी जुलाब मळमळ डायरिया या आजाराने हैराण झाले आहेत हा त्रास केवळ दोन दिवसापासून सुरू झाला आहे मुळात पाईपलाईन शिफ्टिंग नंतर मुख्य टाकीतले पाणी वॉशआऊट करून देखील गढूळ पाण्याचे प्रमाण कमी होत नाहीये आणि याच कारणामुळे या आजारांनी तोंड वर काढले आहे यावर प्रभागाचे नगरसेवक विजय पठारे यांनी आक्रमक भूमिका घेत पाणी वितरण व्यवस्थेला याचा जाब विचारला यानंतर नेहमीप्रमाणे सुप्त अवस्थेतील प्रशासन आज खडबडून जागे झाले पाणी वितरण अभियंतासह नगरसेवक विजय पठारे यांनी स्वतः केडगाव लालानगर येथील पिण्याच्या मुख्य टाकीमध्ये उतरून पाणी वितरण व्यवस्थेला खरी परिस्थिती दाखवून दिली मुळात मुख्य टाक्या मध्येच पाईपलाईन शिफ्टिंग मुळे दोन दिवसापासून गाळ साचल्यामुळे येणाऱ्या नवीन पाण्यात तो मिश्रीत होत आहेआणि तेच पाणी मुख्य टाकीवर आधारित इतर दहा उपटाक्यामध्ये वितरित होत आहे यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे यानंतर मात्र पाणी वितरण अभियंता दीपक गीते यांनी सांगितले की सदर मुख्य टाकी पूर्णतः स्वच्छ करून घेतली जाईल त्यानंतर पाण्याचे नमुने घेतले जातील त्यानंतर उपटाक्यामध्ये सदर पाणी वितरित करण्यात येईल ते करण्यापूर्वी देखील उपटाक्यांची तपासणी केली जाईल यावर नगरसेवक विजय पठारे यांनी सांगितले की सदर टाक्या स्वच्छ केल्यानंतर मी स्वतः त्याची पाहणी करेल त्यानंतरच पाणी वितरित करण्यात यावे तोपर्यंत केडगावकरांना अतिरिक्त पिण्याच्या टँकरची व्यवस्था वसंत टेकडी इथून करण्यात येईलप्रभागातील नागरिकांनी पिण्यासाठी याचा वापर करावा असे आव्हान नगरसेवक विजय पठारे यांनी केले आहे.