दिव्यांगांसाठी सक्षमचे अधिवेशन 2022 उत्साहात संपन्न!

अहमदनगर दि.२९ डिसेंबर (प्रतिनिधी) – अहमदनगर सक्षम आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी सक्षम जिल्हास्तरीय अधिवेशन-2022 चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हे अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.
अधिवेशनास आमदार संग्राम जगताप, अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील, अपंग कल्याणकारी मंडळाच्या विद्या जोशी, डॉ. प्रेरणा दिघे, जगदीश कोंगे, परदेशी, मिसाळ, सक्षम पश्चिम महाराष्ट्रचे प्रांत उपाध्यक्ष श्रीधर बापट, अहमदनगर सक्षमचे डॉ. राजीव चिटगोपेकर, महिला आघाडीप्रमुख संध्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात संपन्न झालेल्या या संमेलनात संघटन मंत्राने सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. राजीव चिटगोपीकर यांनी केले. संध्या कुलकर्णी यांनी सक्षमची माहिती दिली. भारती कुलकर्णी यांनी सक्षम गीत सादर केले.
भाग्यश्री पाटील यांनी दिव्यांगांच्या योजनांची माहिती सांगितली. आमदार जगताप यांनी नेहमी दिव्यांगाना मदत करण्याचे आश्वासन दिले. जगदीश कोंगे यांनी दिव्यांगाना उपलब्ध असणाऱ्या संधी सांगितल्या. श्री परदेशी यांनी दिव्यांगांसाठी असणाऱ्या नोकरी व व्यवसाय याविषयी माहिती दिली. दिव्यांग भाऊसाहेब भोसले याचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. 150 दिव्यांगाना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन वर्षा रोडे यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष श्रीधर बापट यांनी समारोप केला. ज्योती कुलकर्णी यांनी आभार मानले.