‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना अहमदनगर भूषण पुरस्कार प्रदान

अहमदनगर दि. २७ डिसेंबर (प्रतिनिधी) – येथील स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना ग्लोबल स्कॉलरशिप फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यस्तरीय अहमदनगर भूषण पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार शिंदे यांना प्रदान करण्यात आला. हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात, अनाथ मुलांसाठी, बेघर ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कार्यासाठी देण्यात आला.
या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
ग्लोबल स्कॉलरशिप फाउंडेशनकडून मिळालेल्या ॲवॉर्डमुळे केलेल्या कामाचे फलित झाले आहे. आता खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. पुरस्कारासाठी माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल व केलेल्या कामाची पावती दिल्याबद्दल मी ग्लोबल फाउंडेशचे आभार मानतो.
हा पुरस्कार म्हणजे माझा, माझ्या सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे. या सन्मानामुळे आयुष्यात आजवर केलेली मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल अभिमान वाटतो. हा पुरस्कार मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील, अशी प्रतिक्रिया स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी व्यक्त केली.