रात्रीच्या वेळी डिझेल चोरी करणारी टोळी मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांनी केली जेरबंद!

अहमदनगर दि.८ डिसेंबर (प्रतिनिधी)
दि.07/12/2022 रोजी सपोनि राजेंद्र सानप यांना गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली की. इसम नामे आदेश बाळासाहेब शेळके राहणार- अकोळनेर ता.जि. अहमदनगर हा त्याचे ट्रॅक्टरला टँकर जोडून घेवून अकोळनेर ऑईल डेपो शेजारील रेल्वे ट्रॅकवर येथून उभ्या रेल्वे टंकरमधून डिझेल चोरी करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोहेकॉ / जंबे, पोना दहिफळे, पोका बोराडे, चापोहेकॉ इथापे असे अकोळनेर येथे रवाना होवून अकोळनेर गावाकडुन सारोळा कासार गावाचे रोडने जात असताना सुमारे 01 किलोमिटर अंतरावर गेल्यावर रात्री 01/15 वाजणेचे सुमारास समोरून एक ट्रॅक्टर येताना उजेडात दिसला पथकाने गाडी थांबवून खाली उतरून ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा केला तेव्हा ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर थांबविले तेव्हा चालका शेजारी आणखी एक इमस बसलेला होता. चालकास व त्याचे साथीदारास खाली उतरण्यास सांगुन त्यास नाव गाव विचारले असता चालकाने त्याचे नाव आदेश बाळासाहेब शेळके वय 22 वर्षे राहणार अकोळनेर ता. जि. अहमदनगर व त्याच्या साथिदाराने तुषार रोहीदास जाधव वय-32 वर्षे राहणार अकोळनेर ता. जि. अहमदनगर असे सांगितले. त्यास पुन्हा विचारले असता त्याने समक्ष कळविले की, मी माझे साथिदारा चे मदतीने अकोळनेर ऑइल डेपो चे शेजारी असणारे रेल्वे ट्रॅक वरील उभ्या रेल्वे टँकर चा वॉल खोलून त्या द्वारे पाईपने ट्रॅक्टरचे टँकरमध्ये डिझेल भरून आणले आहे असे सांगितले असता उजेडा मध्ये ट्रॅक्टर टँकरची खात्री केली असता डिझेल असल्याचे दिसुन
आले. त्यांच्याकडून खालील वर्णनाचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 1 ) 6,00,000/- रुपये किंमतीचे एक जॉनडियर कंपनिचे हिरवटरंगाचे ट्रॅक्टर बिगर नंबरचा कि अं व त्यास जोडलेले एक लोखंडी टँकर हिरवटरंगाचे बिगर नंबर कि अं
2) 4,62,500/- रुपये किमंतीचे अंदाजे 5000/- लिटर डिझेल प्रती लिटर 92.50 रुपये प्रमाणे किं अं सदर मुद्देमाल मिळून आल्याने तो आरोपीसह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणला आहे.
10,62,500 /- रुपये एकूण
सदर बाबत नगर तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 847/2022 भा.द.वि कलम 285,286,336,379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे आदेश बाळासाहेब शेळके वय 22 वर्षे राहणार अकोळनेर ता. जि. अहमदनगर व तुषार रोहीदास जाधव वय-32 वर्षे राहणार अकोळनेर ता. जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन, पोहेकॉ / जगदीश जंबे,चापोहेकॉ / कैलास इथापे, पोना / धर्मराज दहिफळे, पोकॉ/संभाजी बोराडे यांचे पथकाने केली आहे.