शिरीष विधाते सारख्या खंबीर लढवय्या कार्यकर्त्याचे दुःखद निधनामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाची हानी: रोहित (बंडू भाऊ) आव्हाड

अहमदनगर दि.८ डिसेंबर (प्रतिनिधी) शिरीष विधाते सारख्या खंबीर लढवय्या कार्यकर्त्याचे दुःखद निधनामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाची हानी झाली असल्याच्या भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आंबेडकर ) गटाचे व दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना अहमदनगर जिल्हा नेते रोहित (बंडू भाऊ) आव्हाड यांनी व्यक्त केल्या.फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे माळीवाडा भागातील सामजिक कार्यकर्ते शिरीष शांतवन विधाते (वय:३३) यांचे ६ डिसेंबर रोजी दुःखत निधन झाले.यावेळी अंत्यविधी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सामजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा. यासाठी महापालिका किंवा औरंगाबाद हायकोर्ट येथे जाऊन विचारपूस करणाऱ्या खंबीर कार्यकर्त्यांच्या निधनाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचीच नव्हे तर समाजाची खूप मोठी हानी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आंबेडकरी चळवळीचे विविध गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.