अहिल्यानगर दि. 11 ऑक्टोबर (प्रतिनिधी )- दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने भारत रत्न रतनजी टाटा यांना नगर कल्याण रोड वरील होलसेल फटाका मार्केट मध्ये श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी असो. सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष सुरेशशेठ जाधव, सह सेक्रेटरी अरविंद साठे, संजय सुराणा, सुनील गांधी, देविदास ढवळे, अमोल तोडकर, विकास पटवेकर, उबेद खान, विजय मुनोत अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री बोज्जा म्हणाले रतनजी टाटा यांच्या निधनाने भारताची सर्वच क्षेत्रात मोठी हानी झाली असून टाटा हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. आपल्यातून एक महान व्यक्ती महान रत्न हरपला आहे. अतिशय दानशूर .प्रेमळ दीनदुबळ्याचा कैवारी .करोडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग क्षेत्रात संपूर्ण जगा मध्ये भारताचे नाव उज्वल करणारा माणूस आज सर्वाना सोडून निघून गेला. रतनजी टाटा हे भारताचे आश्रयदाते म्हंटले तर वावगे ठरणार नाही असे बोज्जा म्हणाले.
यावेळी सुरेश जाधव यांनीही श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. अशी सर्वांना आठवणीत राहणारी व्यक्ती .ती म्हणजे माननीय रतनजी टाटा होते.
फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतांना व्यापारी बंधू मोठया प्रमाणात उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा