समाज मंदिराच्या आवारात केलेले अतिक्रमण काढण्याची स्थानिक महिलांची मागणी….

भिंगार (प्रतिनिधी)अहमदनगरच्या भिंगार येथील बोधीसत्व प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या समाज मंदिर परिसरामध्ये स्थानिक महिलेने समाज मंदिर परिसरात अतिक्रमण करून घरावरचे पावसाचे पाणी समाज मंदिरामध्ये काढून दिले आहे. त्यामुळे सदरचे अतिक्रमण काढून समाज मंदिर परिसरातील जागा मोकळी करून देण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.
आमदार दादाभाऊ कळमकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून समाज मंदिर उभारण्यात आले. त्यावेळी अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत होते. मात्र या ठिकाणी राहत असलेल्या स्थानिक महिलेने घरावरचे सावसाचे पाणी समाज मंदिरात काढून दिल्यामुळे पावसाचे पाणी सर्व समाज मंदिरात साचत आहे. या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम घेता येत नाही तसेच समाज मंदिराशेजारी असलेल्या पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन आहे त्यावरून जवळपास 500 ते 600 कुटुंब या पाण्याचा वापर करत होते. मात्र सदरच्या ठिकाणी राहत असलेल्या महिलेने पिण्याच्या पाण्याचे कनेक्शवर देखील अतिक्रमण करून आपल्या घरात घेतल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही नागरिकाला पाण्याचा वापर करता येत नाही त्यामुळे सदरचे अतिक्रमण काढून पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन बाहेर काढून देण्यात यावं अशी मागणी स्थानीक महिलांनी केली आहे.
यावेळी नाथा भिंगारदिवे,वैशाली गजभिव, सुनिता भिंगारदिवे,वनीता भिंगारदिवे,कविता भिंगारदिवे, निशिगंधा गायकवाड, इंदुबाई भिंगारदिवे,राजसबाई गायकवाड, नर्मदा भिंगारदिवे, लक्ष्मीबाई शिंदे, दिपाली जावळे, शांताबाई गायकवाड, रंजना भिंगारदिवे, अश्विनी भिंगारदिवे, आशिष भिंगारदिवे, यांसह बोधिसत्व प्रतिष्ठान महिला मंडळ आणि भिंगार येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.