श्री आनंद महाविद्यालयात जागतिक एड्स दिवस साजरा

पाथर्डी २ डिसेंबर (प्रतिनिधि)
श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब व उप जिल्हा रुग्णालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिना निमित्त विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले तसेच जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. इस्माईल शेख यांनी आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी केले यांनी केले, डॉ. मनिषा मॅडम यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एड्स दिना निमित्त आरोग्यविषयक समस्या व त्यावरील उपचार पद्धती याबद्दल माहिती व मार्गदर्शन केले. डॉ. दरंदले यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती दिली. डॉ. रवींद्र भोईटे यांनी विद्यार्थ्याना एड्स दिना निमित्त शपथ दिली. प्रा. डॉ. जयश्री खेडकर यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. डॉ. बाथुवेल पगारे यांनी आभार व्यक्त केले.
त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांनी एड्स जनजागृती रॅली ला हिरवा झेंडा दाखवला रॅली मध्ये प्रा. सूर्यकांत काळोखे, प्रा. डॉ. अनील गंभीरे, प्रा. जयश्री खेडकर, प्रा. अनिता पवासे, प्रा. डॉ. इस्माईल शेख, डॉ. मनिषा खेडकर, डॉ. दरंदले, डॉ. रवींद्र भोईटे, डॉ. कांबळे, प्रा. डॉ. अशोक वैद्य, प्रा. डॉ. अजिंक्य भोरडे, प्रा. अरूण बोरुडे, प्रा. अभिजीत जोशी सह विध्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.