गुन्हेगारी

आलमगीर येथे कत्तलखाण्यावर भिंगार पोलिसांनी टाकला छापा! २९ हजार रुपयांचे गोमास केले जप्त!

अहमदनगर : दि.१५ नोव्हेंबर (प्रतिनिधी)भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आलमगीर येथे भिंगार कॅम्प पोलिसांनी छापा टाकत २९ हजार रुपयांचे गोमास जप्त केले असल्याची माहिती भिंगार पोलिसांकडून मिळाली आहे.या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या कारवाईची सविस्तर माहिती अशी की, दि.१५/११/२०२२ रोजी भिंगार कॅम्प पोस्टे चे सहा.पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, आलमगीर परीसरात असीम किराणा स्टोअर समोर, आलमगीर मिलींद कॉलनी,तांबोळी यांचे घरासमोर, अलमगीर ता.जि.अहमदनगर येथे पत्र्याचे शेडमध्ये दुकानामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावराचे कत्तल करण्याची मनाई असतांना ही गोवंशीय जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करुन गोमांसाची दुकानामध्ये विक्री करत आहेत.
आत्ता गेल्यास मिळुन येतील अशी बातमी मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोहेकाँ/215 व्ही आर गारूडकर,पोहेकाँ/760 ए एन नगरे,पोना/2178 आर आर द्वारके,पोना/1072 आर टी गोरे,पोना/1407 भानूदास गौतम खेडकर,पोना/1764 सचिन नवनाथ धोंडे,चापोकाँ/619 एस आर शेख,पोना/643 आर एन कुलांगे,अशांनी आलमगीर परीसरात असीम किराणा स्टोअर समोर असीम किराणा दुकान शेजारी आलमगीर,मिलींद कॉलनी,तांबोळी यांचे घरासमोर अलमगीर ता.जि. अहमदनगर येथे छापा टाकून कारवाई केली कारवाई दरम्यान 29,000/- रू किं चे अंदाजे 145 किलो गोमांस मिळून आले तसेच वजनकाटे,वजनमापे,गोमांस कापण्यासाठी लागणारे साहीत्य,जुवाकिअं.असा एकून 29,000/- रू चा मुद्देमाल जप्तकरण्यात आला असून भिंगार कॅम्प पोस्टेला गुरनं 554/2022 भा.द.वी.क 269, 34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारणा) सन 2015 चे कलम 5 (क), 9(अ) प्रमाणे 1)सलीम उर्फ बबा बुढण कुरेशी (वय 63 वर्षे रा.घर नं 37 सदर बाजार,भिंगार ता.जि.अहमदनगर) 2)नावेद सादीक कुरेशी वय (38 वर्षे रा.घर नंं 1919,हमालवाडा, व्यापारी मोहल्ला,झेंडीगेट ता.जि.अहमदनगर) 3) गुफरान शब्बीर कुरेशी (वय 32 वर्ष रा.हमालवाडा,व्यापारी मोहल्ला,झेंडीगेट ता.जि.अहमदनगर) यांचे विरूद्ध पोना/1764 सचिन नवनाथ धोंडे यांच्या फिर्यादीवरून यांनी गुन्हा दाखल केला आहे.पुढील कारवाई पोहेकाँ/1707 पीए.बारगजे हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे सो,यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनी/शिशिरकुमार देशमुख व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे