स्थानिक गुन्हे शाखेचा कोपरगाव येथे अवैध जुगार अड्ड्यावर छापा! 28 आरोपी विरुध्द कारवाई! तेवीस लाख पसत्तीस हजार तिनशे सत्तर किंमतीचा मुद्देमालजप्त!

अहमदनगर दि.२५ नोव्हेंबर (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव येथे अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला असून यावेळी 28 आरोपी विरुध्द कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत तेवीस लाख पसत्तीस हजार तिनशे सत्तर) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.या कारवाईची सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी जिल्ह्यातील जुगार व मटका अशा अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे, पोसई/सोपान गोरे, सफौ/मनोजर शेजवळ, विष्णु घोडेचोर, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/ शंकर चौधरी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, पोकॉ/रणजीत जाधव, योगेश सातपुते, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशाना नेमुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
नमुद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार कोपरगांव, शिर्डी व राहाता परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, टाकळी फाटा येथील धोंडीबानगर, ता. कोपरगांव येथे योगेश बन्सी मोरे याचे इमारतीचे टेरेसवर काही इसम पैशावर खेळला जाणारा तिरट नावाचा तीन पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी विभाग व कोपरगांव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन कारवाई करणे बाबत पथकास सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी विभाग येथील सपोनि/सचिन जाधव, पोना/कु-हे व कोपरगांव शहर पोलीस स्टेशन मधील पोसई/रोहिदास ठोंबरे व स्टाफ यांना बातमीतील हकिगत सांगुन पंचनामा करणे करीता अवश्यक साधने व पंचाना सोबत घेवुन कारवाई करीता सोबत येणे बाबत कळविले.
पथक सर्व साधने व पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी काही अंतरावर वाहने उभी करुन इमारतीचे जिन्यातुन टेरेसवर गेले असता इमारतीचे टेरेसवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी काही इसम गोलाकार बसलेले दिसले. त्यांचे हातामध्ये तीन पत्ते दिसले तसेच मध्यभागी काही पत्ते व पैसे दिसल्याने पथकाची खात्री होताच सर्वांना जागेवर बसण्यास सांगुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये रोख रक्कम व मोबाईल फोन मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत तसेच आरोपींकडे इमारतीचे समोर पटांगणात लावलेल्या वाहनांबाबत विचारपुस करता त्यांनी आम्ही सदर वाहने जुगार खेळण्यासाठी आनल्याचे सांगितल्याने ती जप्त केली कारवाई दरम्यान 28 आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे अंगझडती मध्ये 2,05,670/- रु. रोख रक्कम, विविध कंपनीचे 30 मोबाईल फोन, 04 चारचाकी व 07 दुचाकी वाहने असा एकुण 23,35,370/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कोपरगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 397/2022 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे पोना/376 शंकर संपत चौधरी ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जुगार अड्डयावर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे व त्यांचे अंगझडतीत मिळुन आलेली रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने या बाबत माहिती खालील प्रमाणे –
अ.क्र. आरोपीचे नाव जप्त मुद्देमाल
1. शेखलाल शेखचाँद बागवान वय 57, रा. चर्चरोड, ता. कोपरगांव 47,500/- रोख, मोबाईल फोन व (शाईन)
2. शीतल सुभाषचंद लोहाडे वय 45, रा. मालेगांव, जिल्हा नाशिक 7,520/- रोख व मोबाईल
3. विजय केदु निमसे वय 45, रा. रमाबाई नगर, मनमाड 9,500/- रोख व मोबाईल
4. नंदु पुजा नजन, वय 36, रा. बनरोड, ता. राहाता 23,200/- रोख, मोबाईल व (डिस्कव्हर)
5. इम्रान याकुब मोमीन वय 39, रा. जमदाडे चौक मनमाड, नाशिक 1,70,000/- रोख, मोबाईल व (अल्टोकार)
6. कलिम भिकन बागवान वय 67, रा. इंदीरानगर, कोपरगाव 10,000/- रोख व मोबाईल
7. अश्पाक जमील शेख वय 47, रा. शांतीनगर, मनमाड, नाशिक 7,500/- रोख व मोबाईल
8. नितीन उत्तम शेजवळ वय 36, रा. लासलगांव, निफाड, नाशिक 14,500/- रोख व मोबाईल
9. राहुल दिलीप पाराशेर वय 34, रा. आनंदवाडी, मनमाड, नाशिक 10,500/- रोख व मोबाईल
10. नाना शबा डोळस वय 63, रा. सुभाषनगर, ता. कोपरगांव 3,500/- रोख व मोबाईल
11. शेख अमजद हाशम वय 38, रा. खडकी, ता. कोपरगांव 63,500/- रोख, मोबाईल व (युनिकॉर्न)
12. सुरेश कुंडलिक सातभाई वय 56, रा. येवला, नाशिक 51,500/- रोख, मोबाईल व (मोपेड)
13. गणेश विठ्ठल जेजुरकर वय 31, रा. पानमळा, शिर्डी, ता. राहाता 12,000/- रोख व मोबाईल
14. सोमनाथ बापु वाळके वय 42, रा. लासलगांव, निफाड, नाशिक 4,13,000/- रोख, मोबाईल व (तवेराकार)
15. अनिल देवराम खरात वय 46, रा. लासलगांव, निफाड, नाशिक 15,000/- रोख व मोबाईल
16. योगेश मुकूंद रासकर वय 34, रा. येवला, नाशिक 15,320/- रोख व मोबाईल
17. दिपक रामदास उंबरे वय 46, रा. येवला, नाशिक 17,730/- रोख व मोबाईल
18. कैलास अशोक मुंजळ वय 39, रा. महादेव नगर, कोपरगांव 71,000/- रोख, मोबाईल व (शाईन मोसा)
19. तुषार राजेंद्र दुशिंग वय 28, रा. टिळक नगर, कोपरगांव 6,000/- रोख व मोबाईल
20. मोहसिन कलंदर सय्यद वय 32, रा. सुराला, वैजापुर, जिल्हा औरंगाबाद 6,500/- रोख व मोबाईल
21. दिपक मायकल बनसोडे वय 30, रा. वैजापुर, जिल्हा औरंगाबाद 25,000/ रोख,मोबाईल (ऑक्टीव्हीयाकार)
22. रविंद्र माधव सानप वय 36, रा. येवला रोड, कोपरगांव 50,000/- रोख, मोबाईल व (पल्सर)
23. हरीलाल फकिरा डांचे वय 56, रा. संगमेश्वर, मालेगांव, नाशिक 2,500/- रोख व मोबाईल
24. सुदाम पंढरीनाथ नवले वय 44, रा. तांबोळ, ता. अकोले 7, 07,000/- रोख मोबाईल व (क्रेटाकार)
25. सुभाष लक्ष्मण चावडे वय 38, रा. बाभुळवंडी, ता. अकोले 11,000/- रोख व मोबाईल
26. हरी दगडु करवर वय 42, रा. बाभुळवंडी, ता. अकोले 12,500/- रोख व मोबाईल
27. विरेंद्र अरुणसिंग परदेशी वय 45, रा. येवला, नाशिक 65,000/- रोख, मोबाईल व (युनिकॉर्न)
28. युनूस इकबाल शेख वय 36, रा. खडकी, ता. कोपरगांव 15,000/- रोख व मोबाईल
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.