ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन!

पुणे: आपल्या कसदार अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांना धक्का बसला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. समाज माध्यमांवर अनेक कालाकारांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालवल्याचे वृत्तही समोर आले होते. बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालवत गेली आणि उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र सरकारच्या माहिती कार्यालयाचd/e अधिकृत ट्विटर हँडलवरुन विक्रम गोखलेंच्या निधनासंदर्भातील ट्वीट मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी करण्यात आलं आहे.