उपनगरातील” या” कमानीसमोर चालतोय मटका ! तोफखाना पोलीस का देत नाही दोन नंबर धंदेवाल्याना कायद्याचा चटका!

अहमदनगर दि.२३ नोव्हेंबर (प्रतिनिधी) उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे उदा.मटका, बिंगो,हातभट्टी,सोरट,आदी धंद्याचा सुळसुळाट राजरोसपणे सुरू आहे . तोफखाना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.हे विशेष!
उपनगरातील तपोवन रस्त्यावर संभाजीनगर या उपनगराची कमान दिमाखात उभी आहे.या कमानी समोरच बिंदासपणे मटक्याचा धंदा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.या भागात राहणाऱ्या नागरिकांना या दोन नंबरच्या धंद्यामुळे त्रासाला नेहमीच सामोरे जावे लागते आहे.पण तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून अद्याप कारवाई शून्यच असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर ऐकू लागला आहे. पोलीस दोन नंबर धंदे करणाऱ्यांना अभय देत आहे का? असा संशय आता या परिसरातील व उपनगरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.असो कमानीसमोर चालतोय राजरोसपणे “मटका” तोफखाना पोलीस का देत नाहीत दोन नंबर धंदेवाल्याना “कायद्याचा चटका”! असेच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.आम्ही आपणासमोर अवैध कोठे सुरू आहेत हे नागरिकांसमोर निर्भिडपणे मांडणारच
आहोत. (भाग:७)