फुस लावून पळवलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लागावा: जनआधार सामाजिक संघटना दोन महिने उलटून देखील आरोपी मोकाटच!

अहमदनगर दि.१८ नोव्हेंबर (प्रतिनिधी)- अहमदनगर तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून दोन महिन्यापूर्वी पळून नेले असुन त्याबाबतची रीतसर तक्रार मुलीचे वडील यांनी घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली असुन अद्यापही मुलीचा शोध न लागल्याच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दीपक गुगळे, अमित गांधी, शहानवाज शेख, निलेश सातपुते, विजय मिसाळ, गौतमीताई भिंगारदिवे, आरतीताई शेलार, फारूक शेख आदी उपस्थित होते. अल्पवयीन मुलीचे वडील यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत संशयस्पद मुख्य आरोपी म्हणून सुहास घनश्याम बोठे, तसेच मुलीस पळून नेण्यास मदत करणारे त्याचे मित्र जयदीप कासार, ऋषिकेश ढगे, नवल बोठे, सचिन जाधव या व्यक्तींचे नावे टाकलेली आहे. असे असताना देखील घटना घडल्यापासून जवळपास दोन महिन्यानंतर ज्यावेळी बेपत्ता मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे आत्मदहनाचा इशारा करण्याचे पत्र दिल्यानंतर पोलिसांनी त्यातील काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले तसेच घटनेत वापरण्यात आलेली गाडी ताब्यात घेतली या सर्व चौकशीत पोलीस यंत्रणेला लागलेली दिरंगाई यामुळे पोलीस यंत्रणेच्या कामावर आपोआपच शंका व्यक्त होत आहे. तसेच तपास करणारे पोलीस अधिकारी आरोपींना मदत करत आहेत का? अशी शंका निर्माण होत आहे परंतु पोलीस यंत्रणेच्या या शंकास्पद आणि वेळ काढूपणामुळे बेपत्ता मुलीच्या जीवितस कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी येत्या 15 दिवसाच्या आत पोलीस यंत्रणेमार्फत बेपत्ता मुलीचा तपास न लागल्यास जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.