तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यालगतच एका चिकन दुकानासमोर सुरू असतो “मटक्याचा आकडा”पण मटका चालविणानाऱ्याना पोलीस करत नाही “वाकडा”

अहमदनगर दि.१७ नोव्हेंबर (प्रतिनिधी) उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे उदा.मटका, बिंगो,हातभट्टी,सोरट,आदी धंद्याचा सुळसुळाट राजरोसपणे सुरू आहे . तोफखाना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.हे विशेष!
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाईपलाईन रस्त्यालगतच (श्रीराम चौकाकडे जाणारा रस्ता) गायकवाड चिकन दुकानासमोरच राजरोसपणे मटक्याचा आकडा मटका चालविणाऱ्याकडून खेळवीला जात आहे.पण तोफखाना पोलिसांना या अवैध धंद्याची माहिती नाही.असेच भर रस्त्यावर खुलेआम चालणाऱ्या मटका धंद्याकडे पाहिल्यावर वाटते.या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष मटक्याचा आकडा खेळत व खेळवत असलेल्या लोकांकडे जाते.पण पोलिसांचे लक्ष इकडे जात नाही.हे विशेषच म्हणावे लागेल.अशीच चर्चा या परिसरातील नागरिक करत असतात.म्हणजेच काय तर इथे खेळला जातो राजरोसपणे” मटक्याचा आकडा”पण मटका चालविणानाऱ्याना पोलीस करत नाही “वाकडा” हे उपरोधिकपणे बोलण्याची वेळच नागरिकांवर आली आहे.
(भाग:६)