भिंगार कॅम्प पोलिसांनी केली सुंगंधी तंबाखू जप्त!

अहमदनगर ( प्रतिनिधी ६ नोव्हेंबर) भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिंगार पोलिसांनी सुगंधी तंबाखू जप्त करण्याची कारवाई केली आहे.
याप्रकरणी मुद्देमालासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या बातमीची सविस्तर माहिती अशी की,रविवार दि.06/11/2022 रोजी 11/30 वा.सपोनि श्री.शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,नगर पुणे रोडने एक पांढरे रंगाचा जितो कंपनीचा टेम्पो नं.एमएच 16 सी डी 2411 ही मधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाखू विक्री करण्याचे उद्देशाने चोरून वाहतूक करीत आहे आत्ता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीलायक बातमी माळाल्याने सपोनी/शिशिरकुमार देशमुख यांनी लागलीच पोस्टेचे सफौ/कैलास सोनार,पोहेकाँ/760 अजय नगरे,पोहेकाँ/215 विलास गारूडकर, पोना/2178 राहुल द्वारके,पोना/1072 राहुल गोरे,पोना /भानूदास खेडकर अशांना सदर ठिकाणी जावून कारवाई करा असा आदेश दिल्याने वरील अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी जावून बातमीतील नमूद वाहनास अशोका हाँटेल समोर थाबवून सदरचे वाहन तपासले असता त्यामध्ये 25,000/- रूकिंची सुगंधी तंबाखु मिळून आल्याने सदरचे वाहन पोलीस स्टेशनला आणून 1) मनोहर अर्जुन खेडकर वय 42 वर्षे रा.महेशनगर,नगर पाथर्डी रोड,अहमदनगर 2) सुशील बाळासाहेब केदार वय 23 वर्षे रा.ए/13,चाकन आँईल मिल जवळ,नवनागापुर ता.जि.अहमदनगर सदर मालाचे मालक हे 3)सचिन डोंगरे (पुर्ण नाव माहीत नाही) रा.वडगाव गुप्ता ता.नगर जि.अहमदनगर यांचे विरूद्ध पोना/भानूदास खेडकर यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188,272,273 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.असून त्यामध्ये 3,00,000/- रू किं चा एक पांढरे रंगाचा महींद्रा कंपनीचा टेम्पो त्याचा आरटीओ नं एम एच 16 सी डी 2411 टेम्पो व 25,000/- रू किं ची सुगंधी तंबाखू असा एकून 3,25,000/- रू किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोहेकाँ/गोपीनाथ गोर्डे हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शना खाली सपोनि/शिशिरकुमार देशमुख,सफौ/कैलास सोनार,पोहेकाँ/760 अजय नगरे,पोहेकाँ/215 विलास गारूडकर,पोना/2178 राहुल द्वारके,पोना/1072राहुल गोरे, पोना/भानूदास खेडकर यांनी सदरची कारवाई केली आहे.