१४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर रेशन दुकानात अत्याचार श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

श्रीरामपूर( प्रतिनिधी ४ नोव्हेंबर) १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर रेशन दुकानात अत्याचार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे .या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा परिसरात पहाटे काकडा आरतीला गेलेल्या १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला रेशन दुकानात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी गणेश बबन जगताप (वय 22) याने मुलगी लहान 14 वर्षाची असतानाही तिला इंस्टाग्राम मोबाईल वर मेसेज पाठवून पाठलाग केला व पहाटे रेशन दुकानात पकडून नेले व अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गणेश जगताप याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 (3) 376 (2) ळ, 354 अ, 354 ड व पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी डीवायएसपी संदीप मिटके,सपोनि/थोरात यांनी भेट दिली.