मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीस मंदिरातील देवीच्या गळयातील दागिन्यांसह नगर तालुका पोलिसांनी केले अटक!

अहमदनगर (प्रतिनिधी)
मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीस मंदिरातील देवीच्या गळयातील सोन्याचे दागिन्यांसह नगर तालुका पोलिसांनी केले अटक केले असून याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
नगर तालुका पो.स्टे. I गुरनं. ३८२ / २०२२ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी पोपट सोन्याबापू चेमटे वय ५० वर्षे रा. खांडके ता. जि. अहमदनगर यांनी खांडके गावातील जगदंबा मातेच्या गळयामधे असणारे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले असलेबाबत फिर्याद दिली होती. त्याचा तपास नगर तालुका पोलीस ठाणे कडून सुरु होता.
दि. १८/१० / २०२२ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत सपोनि राजेंद्र सानप यांना सदरची चोरी ही सुभाष दशरथ पवार रा. पवार तांडा, कौंडगाव ता. जि. अहमदनगर यांनी केली असल्याची माहिती मिळाले वरुन त्यांनी पथकामार्फत सापळा लावून सदर आरोपीस ताब्यात घेवून त्यास विचारपूस केली असता सदर सोन्याचे चोरी केलेले मंगळसूत्र हे दौलावडगाव ता. आष्टी जि.बीड येथील सोनाराकडे गहाण ठेवले असल्याचे त्याने सांगितले. सदर सोनार याने गहाण ठेवलेले मंगळसूत्र तात्काळ पोलीस ठाण्यास हजर केल्याने गुन्हयात मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीस आज दि. १९/१०/२०२२ रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मा. पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील सो. व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन, पो.उप.नि. युवराज चव्हाण, पो.हे.कॉ / धर्मनाथ पालवे, पोहेकॉ शैलेश सरोदे, पोहेकॉ / सतिष थोरात, पोना/बाळू कदम, चालक पोकॉ/विठ्ठल गोरे यांचे पथकाने केली आहे.