पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते रमेश कांजवणे यांनी केले मोफत चहा वाटप

मिरजगाव (प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा केला जात आहे.कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नगर सोलापूर हायवेवरती जोतीबावाडी याठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने मोफत चहा वाटप केला यावेळी रमेश कांजवणे यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना व अनेक योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत असल्यामुळे या अनुषंगाने ते स्वतः या योजनेचे लाभार्थी असल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याविषयी असणाऱ्या आदरापोटी आणि येणाऱ्या प्रत्येक योजनेची त्यांच्यापर्यंत मिळणारी योजना व ही योजना सर्वसामान्य पर्यंत कशी पोहोचेल यासाठी ते प्रयत्न करतात . या सर्व गोष्टीं चे अवचित्य साधत मिरजगाव नगर सोलापूर हायवे वरती सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्वसामान्य शेतकरी व गोरगरीब नागरिकांना मोफत चहा चे वाटप केले त्याठिकाणी शेतकऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षवा होत आहे.