महानगरपालिकेने बुजविलेल्या खड्ड्यांमध्ये डांबर दाखवा व दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळवा- नितीन भुतारे वर्षभर लोकांना खड्यात ठेवायचे आणि पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे काम सुरू करायचे हाच मोठा भ्रष्टाचार

अहमदनगर (प्रतिनिधी)अहमदनगर शहरातील जुना कोर्ट दिल्ली गेट या रस्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले असताना महानगरपालिकेला सहा महिन्यानंतर खड्डे बुजविण्याची जागा आली आहे परंतु हे खड्डे बुजवत असताना त्या खड्ड्यांमध्ये फक्त खडी आणि कच टाकून ते खड्डे बुजवण्यात आले आहे त्याच्यामध्ये कुठेही डांबराचे प्रमाण आढळलेले दिसत नाही त्यामुळे अशा अद्भूत पद्धतीने प खड्डे बुजविण्याचे प्रकार महानगरपालिकेच्या वतीने शहराचे शहर अभियंता संबंधित इंजिनिअर यांच्याकडून होत असताना संबंधित ठेकेदाराकडून होत असताना महानगरपालिका आयुक्त यांचे कुठेही लक्ष या शहराकडे राहिलेले नाही त्यामुळे अशा प्रकारे नगर शहरात खड्डे बुजविण्याचे प्रकार सुरू असतील तर हा एक प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाखा आहे आज जर पाहिलं तर अशाप्रकारे खड्डे बुजवल्यामुळे ती संपूर्ण खडी व कच ही रस्त्यावर येऊन अपघातांचे प्रमाण वाढणार गाड्या पंचर होण्याचे प्रमाण वाढणार आधीच नगर शहरातील जनता खड्ड्यांपासून त्रस्त असताना अशा प्रकारचे खड्डे बुजवण्याचे प्रकार जर महानगरपालिका करत असेल तर महानगरपालिकेच्या अधिकारी हे शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने अशा प्रकारचे खड्डे बुजविण्यात येत असल्यामुळे मनसेच्या नितीन भूतारे यांनी संबंधित खड्ड्यांमध्ये खड्डे बुजविलेल्या मटेरियलमध्ये जर कोणाला डांबराचे प्रमाण आढळले तर दहा हजार रुपये बक्षीस मिळवा असे आवाहन नगर शहरातील जनतेला केले आहे. खड्ड्यामध्ये खडी कच व एक बाय एक मीटरच्या खड्ड्यांमध्ये दोन किलो डांबराचे प्रमाण हे असणे गरजेचे आहे तरच हे खड्डे व्यवस्थित भुजल्या जातील व ते भविष्यकाळात खचणार नाहीत परंतु अशा प्रकारचे खड्डे कुठेही बुजविण्यात नगर शहरात आले नसल्यामुळे संपूर्ण खड्डे बुजविण्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने सुरू आहे गणपती विसर्जनाच्या मार्गावर देखील पाहिलं तर असाच प्रकार चालू आहे त्यामुळे या संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांनी सुध्दा नगर शहरात येऊन बुजविळेल्या खड्यांमध्ये डांबर दाखवावे असे आवाहन मनसेचे नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा केले आहे तुम्ही नगर मध्ये येऊन खड्ड्यांमध्ये डांबर दाखवा खड्डे भरण्याचे बुजविण्याचे प्रकार अश्या पध्द्तीने होत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वरे केली आहे वारंवार महानगरपालिका आयुक्तांना पत्र व्यवहार निवेदन देऊन सुद्धा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे आयुक्तांवरचा विश्वास या नगर शहरातील जनतेचा उडालेला आहे. त्यामुळे ही अनोखी अशी स्पर्धा मनसेचे नितीन भुतारे यांनी भरविल्यामुळे नगर शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे त्यातच भ्रष्ट ठेकेदार अधिकारी यांच्यावर कशाप्रकारे कारवाई होते हे पाणी यापुढील काळात गरजेचे आहे.