सराईत गुन्हेगाराला मदत करणारा श्रीरामपूर पोलीस स्टेशनचा पोलिस अखेर निलंबित पोलीस आधिक्षक पाटील यांनी केली निलंबनाची कारवाई!

अहमदनगर( प्रतिनिधी)-सराईत गुन्हेगाराला मदत करणारा श्रीरामपूर पोलीस स्टेशनचा पोलिस अखेर निलंबित केला असून
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
गुन्हेगाराशी आर्थिक हितसंबध असलेल्या व मदत करणाऱ्या श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस सुनील दिघे असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मुल्ला कटर या अट्टल गुन्हेगाराला मदत करणाऱ्या याच प्रकरणात यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय सानप व पोलीस नाईक पंकज गोसावी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.अट्टल गुन्हेगाराशी पोलीसांचे असलेले आर्थिक हितसंबंध आता समोर आले आहे.श्रीरामपूर शहरातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्या बरोबर निकाह केला.सलग तीन वर्षे मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी मुल्ला कटर याला अटक करण्यात आली आहे.याच प्रकरणामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.