नाले सफाई कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून शहर अभियंता व ठेकेदारावर कारवाई करा:अजय साळवे आरपीआय (आठवले) गटाचे मनपा आयुक्तांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) महानगर पालिकेच्या नाले सफाई च्या कामातील भ्रष्टाचाराविरुद्ध ठेकेदार व महानगर पालिकेच्या शहर अभियंता यांच्यावर करावी अशी मागणी आरपीआय (आठवले ) गटाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अजय साळवे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, अहमदनगर महनगरपालिकेने निवेदा काढून नाले सफाईच्या कामाचे मंजुरी आदेश ठेकेदारास देण्यात आले.परंतु सदर ठेकेदाराने चांगल्या पद्धतीने नाले सफाई न करता.या कामाच्या बिलाची रक्कम त्यास देण्यात आली. शहरात चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यातील गाळ मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र दिसत असल्याने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.याचाच अर्थ असा की सादर ठेकेदाराने योग्य प्रतीचे काम केले नाही.तरी देखील महानगर पालिकेच्या शहर अभियंत्याने ठेकेदारास कामची बिले अदा केली असल्यामुळे या बाबतीत ८ दिवसाच्या आत ठेकेदार व शहर अभियंता यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.ही कारवाई न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर युवक जिल्हा अध्यक्ष आमित काळे,ज्येष्ठ नेते चंद्रकांत भिंगारदिवे,रोहित कांबळे आदी कार्यकर्त्यांची नावे आहेत.