अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने केली मोठी कारवाई जिल्ह्यातील प्रलंबित असलेला एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा / अफु/गर्द) नाश!

अहमदनगर (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात ५० एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम गांजा / अफु/गर्द जप्त करण्यात आला होता. नमुद गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करुन मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मा. न्यायालयात न्यायालयीन प्रक्रियापुर्ण करुन मा. न्यायालयाने मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश दिले होते.
मा. पोलीस महासंचालक सो. महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेशान्वये मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक सो. अहमदनगर यांचे अध्यक्षते खाली मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल (सदस्य) तथा अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. श्री. मेघश्याम डांगे (सदस्य) तथा पोलीस उपअधिक्षक (गृह) अहमदनगर, मा. श्री. अनिल कटके (सदस्य) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर, सहा. पो, निरी. गणेश इंगळे, पो. उपनिरीक्षक सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सहा. पो. उपनिरी. विष्णू घोडेचोर, हेकॉ. देवेंद्र शेलार, पो.हे.कॉ. फकीर शेख, पो.हे.कॉ. दत्तात्रेय गव्हाणे, पोहेकॉ. शरद बुधवंत, पो.ना.शंकर चौधरी, पो. ना. विशाल दळवी, पो.ना. राहुल सोळंके, पो.ना. संदीप दरंदले, पो.ना. रणजित जाधव पो. कॉ. शिवाजी ढाकणे, पो.कॉ. नवगिरे, पो. कॉ. रोहित येमुल, पो.कॉ.जालिंदर माने, पो.कॉ. मयूर गायकवाड, पोकॉ. जे.बी जंगले पोलीस फोटोग्राफर चालक पो.हे.कॉ. बबन बेरड, चा. पो.हे.कॉ. उमाकांत गावडे, चा.पो.हे.कॉ. संभाजी कोतकर, चा.पो.ना.बी.एम. बुधवंत अशांनी अहमदनगर जिल्हयातील सन २००३ ते २०२१ पावेतो ५० गुन्ह्यातील एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम गांजा / अफु/गर्द असा नाश करणेसाठी प्रलंबित असलेला अंमली पदार्थ (गांजा / अफु/गर्द ) नाश करण्याची योग्य ती कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन आज सोमवार दिनांक १७ / १० / २०२२ रोजी राजणगांव एमआयडीसी, जिल्हा पुणे येथील कंपनीत नाश केला आहे.
यापुर्वी दिनांक २६/०२/२०२२, दिनांक २७/४/२०२२ व दिनांक २७/०६/२०२२ रोजी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अंमली पदार्थ सदरातील दाखल ९० गुन्ह्यातील एकुण २४०१ किलो १३४ ग्रॅम ५८० मिली ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा / अफु/गर्द) नाश करण्यात आला होता. तसेच दिनांक १७/१०/२०२२ रोजी ५० गुन्ह्यातील एकुण ३८४३ किलो २३८ ग्रॅम १२० मिली ग्रॅम अंमली पदार्थ असा अहमदनगर जिल्ह्यातील दिनांक ०१ जानेवारी २०२२ ते आजपावेतो एकुण १४० गुन्ह्यातील एकुण ६२४४ किलो ३७२ ग्रॅम ७०० मिली ग्रॅम अंमली पदार्थ सदराखालील दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. मेघश्याम डांगे, पोलीस उप अधिक्षक (गृह) अहमदनगर, मा. श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी पुर्ण केलेली आहे.