गुन्हेगारी

भिंगार येथील युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करा – अमोल हुंबे गोहत्या व गोमांस विक्री तसेच शहरात बेकायदेशीर ओळख लपवून बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी

नगर दि. 12 ऑक्टोबर (प्रतिनिधी) :
नगर शहरात मोठ्या प्रमाणावर गो हत्या, गोमांस विक्री, शहरात ओळख लपवून बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य तसेच भिंगार येथील युवक महेश गोराडे यांच्यावरील हल्ला याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी असे निवेदन युवासेनेचे जिल्हा संघटक अमोल हूंबे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने गो हत्या बंदी कायदा आणला असून तरीही नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गोहत्या व गोमांस विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे व गोमास तस्करी देखील वाढले आहे. त्याच्यावर तात्काळ कारवाई करा तसेच नगर शहरामध्ये बांगलादेश येथील बरेच कुटुंब नगर शहरामध्ये आपली ओळख बदलून वास्तव्यास आढळून आले आहे. काहीजण आपली ओळख बदलून देखील राहत आहे त्यांच्यावरही तातडीने कारवाई करावी.
भिंगार आलमगीर माधवबाग येथील राहणारा महेश बोराडे याच्यावर भिंगार प्राण घातक हल्ला झाला, असून त्याला आरोपींनी सुपा येथे जखमी अवस्थेमध्ये टाकून दिले होते. आपल्या पोलीस प्रशासनामुळेच या महेश गोराडे याचा जीव वाचला यासाठी पोलीस प्रशासनाचे आभार परंतु यातील आरोपींवर पोलीस प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई करा. अशी नम्र विनंती करतो अन्यथा येत्या दिनांक 18/10/2022 रोज बुधवारी तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढून आपल्या कार्यालयासमोर डीएसपी चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे