ब्रेकिंग

कानडगांव दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

अहमदनगर दि. १ ऑगस्ट (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील कानडगांव दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी विक्रम संजय मोताळे वय 33, रा. कानडगांव, ता. राहुरी हे दिनांक 18/05/23 रोजी रात्री कुटूंबियासह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी 6-7 अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करुन गावठी कट्टा, तलवार व चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन सोन्या चांदीचे दागिने व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण 65,500/- रुपये किंमतीचा माल चोरुन नेला होता. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 540/23 भादविक 395 सह आर्म ऍ़क्ट 3/25 व 4/25 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि स्थागुशा व पोनि राहुरी पोलीस स्टेशन यांना सदर गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. परंतु तपासा दरम्यान आरोपी निष्पन्न होत नव्हते.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जुलै 2023 मध्ये आयोजित गुन्हे परिषदे वेळी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्ह्याचा पुन्हा नव्याने तपास सुरु करुन आरोपी निष्पन्न करुन उघडकिस आणणे बाबत आदेशित केल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ/शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चापोकॉ/संभाजी कोतकर व चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुण सदर दरोड्याचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथकाने घटना ठिकाणी जावुन फिर्यादी व साक्षीदारांकडे आरोपींचे वर्णन, पेहराव, बोलण्याची पध्दत बाबत विचारपुस करुन आरोपींची ओळख पटविणे तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली पांढरे रंगाचे स्विफ्ट कारचा साक्षीदारांनी कानडगांव ते वरशिंदे असा पाठलाग केला त्याबाबत साक्षीदारांकडे विचारपुस करुन तपास सुरु असताना. घटना ठिकाण व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाचे आधारे तपास करुन सराईत आरोपी नामे शोएब दाऊद शेख रा. कानडगांव, राहुरी याचे हालचाली बाबत संशय बळावल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यास इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) शोएब दाऊद शेख वय 25, रा. कानडगांव, ता. राहुरी अस असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीचे इतर साक्षीदार न 2) गॅसउद्दीन ऊर्फ गॅस रजाउल्ला वारसी वय 21, 3) नफीस रफीक सय्यद वय 23 दोन्ही रा. सिडको, जिल्हा नाशिक, 4) अश्पाक ऊर्फ मुन्ना रफीक पटेल वय 21, 5) शेखर राजेंद्र शिंदे वय 24 दोन्ही रा. कोल्हार, ता. राहाता, 6) मंगेश बबनराव पवार वय 32 रा. इंदीरानगर, ता. श्रीरामपुर, 7) सलमान आदमाने रा. श्रीरामपूर (फरार), 8) समीर सय्यद रा. पंचवटी, नाशिक (फरार), 9) हासीम खान रा. सिडको, नाशिक (फरार) हे विविध ठिकाणावरुन मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे फरार साक्षीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
कानडगांव, ता. राहुरी येथे दाखल दरोड्या सारख्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करुन, कौशल्य पणास लावुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/ दिनेश आहेर व पथकाचे अभिनंदन केले आहे.
आरोपी सोहेब दाऊद शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंगाचा एक गुन्हा दाखल आहे. तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. राहुरी गु.र.नं. 400/21 भादविक 354(अ), 324, 427, 323, 504, 143, 148
आरोपी मंगेश बबनराव पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण असे गंभीर स्वरुपाचे एकुण 3 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. चकलांबा, जिल्हा बीड गु.र.नं. 69/13 भादविक 307, 147, 148, 323, 506 सह आर्म 3/25
2. येवला शहर, जिल्हा नाशिक गु.र.नं. 11/16 भादविक 364 (अ), 363, 384, 387, 120 (ब) आर्म ऍ़क्ट 3/25
3. कोपरगावं शहर गु.र.नं. 166/19 भादविक 307, 143, 147, 149, 324 मपोका 135
आरोपी सद्दाम गुलाब शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंगाचा एक गुन्हा दाखल आहे. तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपुर शहर गु.र.नं. 442/12 भादविक 354,323,504,506,34
आरोपी गॅसुद्दीन रज्जाउल्ला वारसी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. शिर्डी गु.र.नं. 237/2021 भादविक 302, 34
आरोपी अश्पाक ऊर्फ मुन्ना रफीक शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात आर्म ऍ़क्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल आहे. तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. लोणी गु.र.नं. 620/2022 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे