प्रशासकिय
बहुजन रयत परिषदेच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे सपोनि वाघ यांचा सत्कार!

अहमदनगर दि. २१ जुलै (प्रतिनिधी) नगर शहरातील शहर वाहतूक शाखेला नव्यानेच रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचा बहुजन रयत परिषदेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी विषयी चर्चा करण्यात आली.आपण लवकरच शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करणार असल्याचे मत सपोनि वाघ यांनी व्यक्त केले.या सत्कार प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे शहर अध्यक्ष सतीश थोरात,देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक महेश भोसले,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकभाऊ पवार,सामजिक कार्यकर्ते संजूभाऊ ताकवाले,एक कप चहाचे संचालक महेश उर्फ सोनू कांबळे आदी उपस्थित होते.