वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह. पाथर्डी तालुक्यात झालेल्या कामाची व त्याच्या खर्चाची चौकशी होऊन प्रत्यक्ष झाडे दाखवा मोहीम राबवण्याची मागणी. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.

अहमदनगर दि.२१ (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागामार्फत पाथर्डी तालुक्यात झालेल्या कामाची व त्याच्या खर्चाची चौकशी होऊन प्रत्येक झाडे दाखवा मोहीम राबवण्याचा मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सामाजिक वनीकरण कार्यालय समोर बैठा सत्याग्रह करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के समवेत भारतीय टायगर फोर्सचे जिल्हाध्यक्ष अँड.योगेश गुंजाळ, सरचिटणीस नागेश शिंदे, विनायक चौधरी आदी उपस्थित होते. मागील 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत पाथर्डी तालुक्यामध्ये रस्ता दुतर्फा लागवड ग्रामपंचायत अंतर्गत लागवड व सर्व रोप वनाच्या निर्मितीकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे. तालुक्यात वृक्षसंपदा वाढावी या हेतूने विविध योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात आपल्या खात्या तर्फे वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. रस्ते दुतर्फा, कॅनल दुतर्फा, ग्रामपंचायत मालकीचे व गायरान क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात खर्च करून वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. संबंधित लागवडीमध्ये वेगवेगळ्या गावांमधील नागरिकांची व आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सक्षम आपण पाथर्डी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लागवड केलेल्या वृक्षाची झालेली वाढ व त्या ठिकाणी प्रत्यक्षात असणारी झाडे व त्यावरील झालेला खर्च यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी होण्यासाठी तसेच मोका तपासणी ही आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यावर झालेल्या खर्चाचा दप्तरा सह वंचित बहुजन आघाडीच्या वेगवेगळ्या गावातील कार्यकर्त्यां समक्ष. येत्या 8 दिवसात छायाचित्रण करून व्हिडिओ शूटिंग करून करण्यात यावी या मागणीचे पत्र देऊन देखील एक महिना होऊनही कार्यालयामार्फत कोणते प्रकारची कारवाई केली नसून. वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह चालू करण्यात आलेला आहे.