राजकिय

राजकीय पदाधिकाऱ्यांनंतर विद्यार्थी, युवकांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश ; जिल्हाध्यक्ष काळेंनी विद्यार्थी, युवकांना दिला चतुश्रृती कार्यक्रम

अहमदनगर दि.३० जुलै (प्रतिनिधी ): विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचे काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश सत्र सुरू आहे. राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यानंतर आता शहरातील विद्यार्थी व युवकांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल काळोखे यांनी आपल्या विद्यार्थी, युवक सहकाऱ्यांसह काळे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी, युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, मोजेस ससाणे, राहुल खरात, श्रेयस वैराळ, सारिका काळोखे, साहिल वाघमारे, मच्छिंद्र साळुंखे, सुरज गुंजाळ, शंकर जगताप, हर्षल काकडे, शंकर आव्हाड, अक्षय पाचरणे, विशाल घोलप, ओंकार नऱ्हे, अजय घोलप, स्वप्निल पाठक, सागर बिल्ला, काँग्रेस शहर उपाध्यक्ष अशोक शिंदे, निलेशदादा चक्रनारायण, इंजि. सुजित क्षेत्रे आदी उपस्थित होते.
अतुल काळोखे यांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या कार्याला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले आहे. विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार राहिला आहे. युवा फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. दरवर्षी युवा फाउंडेशन मार्फत समाजात चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. आजवर त्यांनी नेत्र तपासणी शिबीर, रक्तदान शिबिर, विद्यार्थी व युवकांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन, अपंगांना मदत, अनाथ कुष्ठरोग्यांना मदत करणे असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांना युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अतुल काळोखे म्हणाले की, नगर शहरामध्ये दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. रोजगाराच्या संधी तर दुरापस्त झाल्या आहेत. विद्यार्थी, युवकांना शिक्षण, रोजगारासाठी नगर सोडून बाहेर जावे लागते. यासाठी नगर शहरातील विद्यार्थी, युवकांसाठी आपल्याच नगरमध्ये दर्जेदार उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची गरज आहे. या संधी नगर शहरामध्ये आणण्याचे व्हीजन हे उच्चशिक्षित, सुसंस्कृत युवा नेतृत्व असणाऱ्या किरण काळे यांच्यामध्ये आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन मी व माझ्या सहकाऱ्यांनी विद्यार्थी व युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

📌 *जिल्हाध्यक्ष काळेंनी विद्यार्थी, युवकांना दिला चतुश्रृती कार्यक्रम :
विद्यार्थी, युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या युवांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी चतुश्रृती कार्यक्रम दिला आहे. नगर शहरातील विद्यार्थी व युवकांची पिढी या चतुश्रृतीवर आधारित घडविण्याचे काम काँग्रेस करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
*चतुश्रृती पुढील प्रमाणे :*
◾ *विद्यार्थी व युवकांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन करणे,*
◾ *विद्यार्थी व युवकांना गुंडगिरी व गुन्हेगारीकडे वळण्यापासून परावर्तित करणे*
◾ *त्यांना व्यसनाधीन होण्यापासून रोखणे, व्यसनाधिनतेकडे वळालेल्या विद्यार्थी व युवकांना व्यसनमुक्त करणे,*
◾ *नीतिमत्ता, मूल्य, वडीलधाऱ्यांचा आदर, सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहण्याची दृष्टी असणारे संस्कारक्षम विद्यार्थी व युवक घडविणे.
विद्यार्थी अध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, युवक अध्यक्ष प्रवीणभैया गीते पाटील म्हणाले की, किरण काळे यांनी विद्यार्थी व युवकांना दिलेल्या चतुश्रृतीची अंमलबजावणी करणे हे नगर शहरातील भावी युवा पिढी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज शहरातील युवकांमध्ये शिक्षण व रोजगारासाठी नगर शहराबाहेर स्थलांतर करावे लागत असल्यामुळे आणि शहरामध्ये या संधींचा अभाव असल्यामुळे नैराश्याची भावना आहे. पालकांमध्ये देखील उदासीनता आहे. त्यामुळे काळे यांनी दिलेल्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे काम माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व युवक काँग्रेस शहरामध्ये करणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे