आरपीआय च्या वतीने ७ मार्चला राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा

राहुरी (प्रतिनिधी )-राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे ग्रामसभेत महापुरुषांच्या स्मारकावरून वाद निर्माण होऊन महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने सोमवार दिनांक ७ मार्च रोजी राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी आज शुक्रवार दि.४ मार्च रोजी राहुरी फॅक्टरी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी टाकळीमिया येथील ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे ही स्मारक उभारावे असा मुद्दा एका महिलेने मांडला असता तिला विरोध करून गावातील ५ लोकांनी मारहाण करून विनयभंग केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राहुरी तहसील येथे टाकळीमिया ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात सदर महिला ही समाजकंटक असून तिला तालुक्याबाहेर काढा अशी मागणी मोर्चाकऱ्यांनी केली.या घटनेचा निषेध म्हणून सोमवार दि.७ मार्च रोजी आरपीआयच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यात मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष थोरात यांनी सांगितले.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे, उपतालुका अध्यक्ष सुनील चांदणे,प्रदीप भोसले, अतुल त्रिभुवन, फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे, संजय गिरी, माऊली भागवत, कुमार भिंगारे, गणेश ओहळ, मयूर कदम सुरेश लोखंडे, नवीन साळवे, नंदू सांगळे,सुभाष गायकवाड भाऊसाहेब दिवे महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई बोरुडे ,महिला राहुरी तालुका उपअध्यक्ष छायाताई दुशिंग,प्रियांका सगळगिळे,उषा सगळगिळे,नीलम सगळगिळे, मंगल बारसे व आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.