चालक दिनानिमित्त रिक्षा चालकांचा प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सन्मान

अहमदनगर दि. 19 सप्टेंबर (प्रतिनिधी)-उपप्रादेशिक परिवहन अधीक्षक कार्यालय व अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने चालक दिनानिमित्त ज्येष्ठ रिक्षा चालकांचा मोटार वाहन निरीक्षक शाम चौधरी, उप मोटार वाहन निरीक्षक कल्पेश सूर्यवंशी, हनुमंत पारधी व अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन यांच्या हस्ते ज्येष्ठ रिक्षाचालक विश्वनाथ गहिले, संजय शहाणे, सतीश मते, असलम शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिक्षाचालक पोपट कांडेकर, किशोर कुलट, सुरेश शिरसाट, संजय सहाने, राजेश उपळे, विश्वनाथ गहिले, रिजवान शेख, बाळू बेल्हेकर, लक्ष्मण शिंदे, देविदास भैरट, दीपक गहिले, रवि वाघ, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडणीकर, प्रल्हाद शवलट, मच्छिंद्र शिंदे, दिलीप गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संतोष दीक्षित, सुरज टिपरे, सुलतान शेख, सतीश मते, संतोष दुसुंगे, असलम शेख, अनिल बोरुडे आदीसह मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते. यावेळी मोटर वाहन निरीक्षक शाम चौधरी यांनी चालक दिनानिमित्त सर्व चालकांना शुभेच्छा देत चालकांनी नियमाप्रमाणे आपले वाहने सावकाश चालून आपले व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली. तर यावेळी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन म्हणाले की रिक्षाचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून पुरेसे थांबे नसून उप प्रादेशिक परिवहन अधीक्षक कार्यालय मार्फत रिक्षा चालकांना सहकार्य करण्याचे सांगितले.