एअरटेल कंपनीच्या चार फॅट बॉक्स व केबल चोरी. चोरीचे प्रकार घडू नये यासाठी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी – सोफियान कुरेशी.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी एअरटेल कंपनी कडून शहरात बसवण्यात आलेल्या प्रायमरी फ्लॅट बॉक्स व फायबर केबल चोरी झाल्याची घटना समोर आलीय काही इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला असुन. याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशन येथे सोफियान हुसैन कुरेशी यांनी गुन्हा दाखल केला. असून यांनी फिर्याद दिली व पुढे म्हणाले की एअरटेल कंपनीचे इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी बसवण्यात आलेले प्रायमरी फॅट बॉक्सचेक केले असता ते बॉक्स तेथे नव्हते त्यामुळे चोरी झाल्याचे दिसून आले. शहरातील डावरे गल्ली, बांबू गल्ली, नवी पेठ येथे ही प्रायमरी बॉक्स व वायर चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे लवकरात लवकर आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई करण्यात यावी व असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.