क्रिडा व मनोरंजन

१६.५० लाखांची रोख बक्षिस, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नामांकित मल्ल उद्या मैदानात उतरणार – स्वागताध्यक्ष किरण काळे

कोण होणार छत्रपतीशिवराय कुस्ती चषकाचा मानकरी ?, नगरकरांसह महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला!

अहमदनगर दि.२७ मे (प्रतिनिधी): उद्घाटनानंतर वाडीया पार्कच्या कुस्ती आखाड्यामध्ये कुस्त्यांचा थरार रंगला आहे. शनिवार २८ मेला सायंकाळी साडेचार वाजता अंतिम कुस्त्यांच्या सामन्यांची रंगत नगरकरांना अनुभवायला मिळणार असून राष्ट्रीय व राज्य स्तरावरील नामांकित मल्ल उद्या मैदानात उतरणार असून रु. १६.५० लाखांची लाख रुपयांची रोख बक्षीस कुस्ती विजेत्यांना दिली जाणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवराय कुस्ती चषकाचा महाराष्ट्राचा मानकरी कोण होणार याची उत्सुकता नगरकरांसह महाराष्ट्राला लागली असून ती शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र केसरी ही राज्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मात्र या स्पर्धे पेक्षाही अनेक पटीने मोठ्या रकमांची रोख बक्षिसे किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने दिली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आज पर्यंतच्या कुस्ती क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात भव्य अशा कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांना मिळाला आहे.
अंतिम सामन्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ पार पडणार असून यावेळी राज्य मंत्रिमंडळातील महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची व सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेला पहिल्या दिवसापासूनच कुस्तीप्रेमींनी पसंती दिल्यामुळे कुस्त्या पाहण्यासाठी नगरकरांची गर्दी होत आहे. शनिवारी सायंकाळी नामांकित मल्लांमध्ये अंतिम सामन्यांच्या चित्तथरारक कुस्त्या रंगणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, यावर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता महेंद्र गायकवाड, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू वेताळ शेळके, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू तुषार डूबे, युनिव्हर्सिटी चॅम्पियन शुभम काळे, महाराष्ट्र चॅम्पियन अतुल माने, राष्ट्रीय खेळाडू युवराज खोपडे यांच्यासह अनेक पुरुष नामवंत मल्ल मैदानात उतरणार आहेत.
तर मुलींच्या खुल्या गटातून आंतरराष्ट्रीय ख्यातीची पैलवान प्रतीक्षा बागडेसह सतरा वेळा आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवणारी कॉमनवेल्थ राष्ट्रकुल स्पर्धेची सुवर्णपदक विजेती महिला मल्ल रेश्मा माने ही देखील मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती पैलवान रूपाली माने, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान तृप्ती जगदाळे, राज्यस्तरीय पैलवान सुप्रिया तुपे, राष्ट्रीय रौप्यपदक विजेती पैलवान कीर्ती पवारसह अनेक नामांकित महिला मल्लांच्या कुस्त्या रंगत आणणार आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील व राज्यातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या कुस्त्यांचा आनंद लुटावा असे आवाहन स्वागताध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे