जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना उत्कृष्ट संस्था चालक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रदान!

अहमदनगर दि.२६ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इंग्लिश स्कूलस ट्रस्ट असोसिएशनच्या (मेस्टा) वतीने केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना उत्कृष्ट संस्था चालक हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. मेस्टाचे वार्षिक अधिवेशन मुंबई मंत्रालय येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांच्या हस्ते कटारिया यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जे.एस.एस. गुरुकुलच्या माध्यमातून प्राचार्य आनंद कटारिया विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. कोरोना काळातही शिक्षण व उपक्रम बंद न ठेवता ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन शंभर टक्के त्यांचा अभ्यासक्रम पुर्ण करुन घेण्यात आला. तसेच हसत-खेळत शिक्षण, पर्यावरणातून शिक्षण व विविध कृतीशील उपक्रम शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आले. या कार्याची दखल घेऊन मेस्टाच्या वतीने कटारिया यांना उत्कृष्ट संस्था चालक बहुमान मिळाला आहे.