कर्जत-जामखेडला आ रोहित पवार यांच्यासारखा दूरदृष्टीचा लोकप्रतिनिधी – ना मुंडे

कर्जत-जामखेडला आ रोहित पवार यांच्यासारखा दूरदृष्टीचा लोकप्रतिनिधी – ना मुंडे
कर्जत प्रतिनिधी : दि २६
कर्जत-जामखेडला आ रोहित पवार यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा लोकप्रतिनिधी मिळाला हे भाग्य आहे. आज त्यांच्या माध्यमातून गरजवंत असणाऱ्या लाभार्थींना सरळ लाभ देण्याचे काम कौतुकास्पद आहे. अनेक वर्षांपासून गरजवंत असणारे लाभार्थींना अवघ्या दोनच महिन्यात लाभ देण्याचे काम वाखान्याजोगे आहे. जो एक मंत्री होता त्याला काही करता आले नाही त्या एका आमदाराने या मतदारसंघात सहज करून दाखवले. याला म्हणतात खरा लोकप्रतिनिधी जो लोकांच्या मनातला आहे. जो लोकांचे मन सहज जाणतो ते व्यक्तिमत्व म्हणजे आ रोहित पवार असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री ना धनंजय मुंडे यांनी केले. ते कर्जत येथे विशेष मोहिमेतील लाभार्थी यांना लाभ मंजुरी आदेश वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी आ रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, सभापती मनीषा जाधव, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, संजय गांधी समितीचे अमृत खराडे यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. यावेळी सरळ लाभ मिळाल्याने अनेक लाभार्थीना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी पुढे बोलताना ना धनंजय मुंडे म्हणाले की, कोरोना काळात कुटुंबाची कर्ता व्यक्ती मरण पावली ते कुटुंब हवालदिल झाले होते त्यास आधार देण्याचे काम आ पवार यांनी उत्तम बजावले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत माणुसकी मेली. दुसऱ्या लाटेत मात्र तीच माणुसकी जागृत झाली. कोरोनासदृश्याना मोठा आधार देण्याचे काम मित्र परिवाराने केले. आज ती तडफड भोंगा काढा, येथे लावा. हनुमान चालीसा पठण कुठे करावे यावर चालू झाली आहे. मात्र महागाईवर साधे कोणी शब्द देखील काढत नाही याचे दुर्दैव वाटते. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाचे कोणालाच काही पडले नाही म्हणत विरोधकांचे कान ना धनंजय मुंडे यांनी टोचले.
यावेळी बोलताना आ रोहित पवार म्हणाले की, मतदारसंघातील सर्वच प्रमुख अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात देखील व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थ्याच्या उंबऱ्यापर्यंत पोहच केल्या. त्याबद्दल सर्वाचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. यापूर्वी असे सरकारी लाभ लाभार्थ्याना प्राप्त करण्यासाठी मधले काही व्यक्ती मोठी रक्कम घेत त्याचा व्यवसाय करीत असल्याचे पहावयास मिळत होते. मात्र आपण लोकप्रतिनिधी झाल्यापासून या सगळ्या गोष्टी तात्काळ बंद करीत सरकारी योजना लाभार्थीपर्यंत पोहच करण्यासाठी एक ही रुपया कोणत्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात येऊ नये असा फतवा काढत आज सरळ लाभ या लाभार्थींना देण्यात यशस्वी झालो. आज त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आपल्या मनाला समाधान मिळाले अशी भावना आ रोहित पवार यांनी व्यक्त केली. यासह शासकीय धान्य योजना, मिशन वात्सल्य यासाठी लाभार्थी शोधून गरजवंताना त्याचा लाभ मिळणार आहे. आपल्या मागे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असल्याने मतदारसंघात कसल्याही निधीची कमतरता भासणार नाही. जे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत ते सोडविण्याची ग्वाही उपस्थित जनसमुदायास दिली.
यावेळी तलाठी हरीशचंद्र नांगरे, निराधार समितीचे बापूसाहेब नेटके, याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बळीराम यादव, युवकचे नितीन धांडे, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, प्रकाश बुरुंगले, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी महसुल विभागाच्या विविध योजनेचा आढावा आणि त्यावर कर्जत उपविभागाने केलेले कार्य विशद केले. शेवटी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आभार मानले.
***** मी आमदार नसून कुटुंबातलाच एक व्यक्ती आणि एक साधा कार्यकर्ता : आ पवार
आपण आमदार नसून मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील घरातील एक सदस्य असून एक साधा कार्यकर्ता म्हणून कायम राहणार आहे. यासह मतदारसंघात कोणी दमदाटी, दहशत करीत असल्यास त्यावर कारवाईच झाली पाहिजे असे निर्देश दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.