माजी खा.प्रा.जोगेंद्रजी कवाडे २ सप्टेंबर रोजी अहमदनगर दौऱ्यावर!

अहमदनगर( प्रतिनिधी):-पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.प्रा.जोंगेद्रजी कवाडे सर दि.2 सप्टेंबर 2022 रोजी अहमदनगर दौर्यावर येत आहेत.
लोकनेते स्मृतीशेष भैय्यासाहेब गायकवाड यांच्या पत्नी व जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या मातोश्री हेमाताई भैय्यासाहेब गायकवाड
यांच्या सेवापूर्ती समारंभास उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.अशी माहिती सुमेध गायकवाड यांनी दिली आहे.प्रा.जोगेंद्र कवाडे हे सकाळी 11.30 वा. नगरमध्ये येणार असून दि. २ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतील व त्यानंतर पोलिस बॅक्वेट हॉल,न्यू आर्टस् कॉलेज समोर,लालटाकी,नगर येथे सेवापूर्ती कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.यावेळी ते कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत.तरी या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन प्रा.जयंत गायकवाड, नितिन कसबेकर,शहर जिल्हाध्यक्ष महेश भोसले, नितिन कसबेकर,,महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे,युवक जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे,युवानेते सोमाभाऊ शिंदे,किरण जाधव,रऊफ कुरेशी,विशाल गायकवाड, नितीन साळवे आदिंनी केले आहे.