प्रशासकिय

संगमनेर उपविभाग महसूल वसूली मध्ये जिल्ह्यात अव्वल

संगमनेर तालुक्यात २४ कोटी ५२ लाखांचा महसूल गोळा

शिर्डी, दि.१ एप्रिल (प्रतिनिधी) जमीन व गौण खनिज महसूल यातून मार्च अखेर संगमनेर महसूल विभागासाठी १०० टक्के महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. संगमनेर उप विभागाने प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महसूली वसूलीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तर संगमनेर तालुक्याने कर्जत नंतर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. संगमनेर तालुक्यातील महसूल यंत्रणे कष्ट घेत आज अखेर सुमारे २४ कोटी ५२ लाख २४ हजार रुपयांची वसूली केली. महसूल उद्दिष्टापेक्षा जास्त वसूली करत १२६.८० टक्के महसूल उद्दिष्ट तालुक्याने साध्य केले आहे. अशी माहिती संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
महसूल विभागाच्या अंतर्गत जमीन महसूल, अनधिकृत अकृषक कर नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर ” इतर कर तसेच गौण खनिज परवाने, शासकीय यंत्रणा स्वामित्व धन, अनधिकृत गौण खनिज या माध्यमातून संगमनेर महसूलसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १०० टक्के जमीन महसूलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते. यात जमीन महसूल पोटी १० कोटी १२ लाख ८३ हजार तर गौण खनिज पोटी १४ कोटी ३९ लाख ४१ हजारांचा महसूल जमा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे यांचे मार्गदर्शन, प्रांतधिकारी शशिकांत मंगरूळे यांचे वस्तुनिष्ठ नियोजन व मार्गदर्शन यामुळे हा जमीन महसूल जमा करण्यास राहाता तहसील विभागाला यश आले आहे‌. असे ही तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले आहे
कोवीड परिस्थिती असूनही जमीन महसूल, नजराणा प्रकरण, मोजणी, कुळ कायदा प्रकरण, बिनशेती, शर्तभग, अनाधिकृत एनए, तुकडा नियमाकुल, शासकीय कामे रॉयल्टी, गौंण खनिज दंड, वाहतूक कारवाई या माध्यमातून २४ कोटी ५२ लाख २४ हजार रूपयांची वसुली करत १२६.८० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.
निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकार व कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक प्रयत्न, मेहनतीने वसूली पूर्ण केली. या महसूल वसूलीबद्दल तहसीलदार अमोल निकम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे