
अहमदनगर दि.१ ( प्रतिनिधी)-संबोधी विद्यार्थी वसतीगृहाचे अधिक्षक फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णा कुंडलीक साबळे सर (वय५३ )यांचे शुक्रवार दि.१एप्रिल २०२२ रोजी दु:खद निधन झाले.त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा एक मुलगी व तीन बंधू असा परिवार आहे.संबोधी विद्यार्थी वस्तीगृहातील आधारवड हरपला.चळवळीतील एक निष्ठावंत सैनिक काळाच्या पडद्याआड.बहुजन शिक्षण संघात गोरगरिबांची मुले कसे शिकतील व त्यांची कशी प्रगती होईल यासाठी साबळे सर यांनी खूप प्रयत्न केले. साबळे सर अतिशय मनमिळावू स्वभावाचे व विद्यार्थी गोरगरीब लोकांना मदतीची भावना ठेवणारे होते.त्यांची अंत्ययात्रा संबोधी विद्यार्थी वसतीगृह अहमदनगर येथे निघुन अमरधाम येथे ठिक दु.१२.०० वा.अंत्यसंस्कार करण्यात येईल.