प्रशासकिय
स्कूल बस मालकांना वार्षिक करामध्ये सूट
वाहनाचे नूतनीकरण करुन घेण्याचे आरटीओ विभागाचे आवाहन

अहमदनगर,दि.२४ (प्रतिनिधी) – कोविड विषाणूमुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे 28 जानेवारी 2022 च्या शासन अधिसूचने अन्वये वार्षिक कर भरणाऱ्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी करामध्ये शंभर टक्के सूट देण्यात आली आहे.
स्कूल बसेस वाहन मालकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रत्येक शनिवारी ऑनलाईन अॅपाईंटमेंट घेऊन विशेष कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. संबधितांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.