पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खेळले नैसर्गिक रंग

कर्जत( प्रतिनिधी) : दि २३
साहेब कार्यलयात आहात का ? ओके आलोच पाचच मिनिटात” असे फोन कर्जतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना करीत नैसर्गिक रंगात न्हाऊन निघालेले पत्रकार जेव्हा कार्यालयात दाखल होतात. तेव्हा अनेकांना त्याची ओळख सुद्धा न होता जेव्हा रंग खेळण्यासाठी पुढे येतात तेव्हा अरे बाबा तुम्ही सगळे म्हणत पत्रकारांबरोबर नैसर्गिक रंग खेळत एकमेकांना रंगपंचमीच्या शुभेच्छाची देवाण-घेवाण घेत हसत-खेळत निरोप दिला जातो.
मंगळवार, दि २२ रोजी सकाळी सर्व पत्रकार बसस्थानक परिसरातील पत्रकार कट्टयावर एकत्र जमतात. चहापान उरकल्यानंतर एकमेकांना रंग लावत रंगपंचमीच्या शुभेच्छा सुरू होतात. सगळ्यांच्या मनात एक कल्पना सुचते आपण बातमीसाठी माहिती घेताना अधिकाऱ्याना दररोज फोन करतात. आज एक आगळी-वेगळी रंगपंचमी साजरी करू म्हणत प्रत्येक प्रमुख अधिकाऱ्याना कॉल करत कार्यालयात उपस्थित असल्याची माहिती घेतात. आणि मग खरी रंगपंचमी खेळण्याची कल्पना अमलात येते. रोज उत्तम वेशभूषा असणारे सर्व पत्रकार नैसर्गिक रंगात भिजलेले पाहत अनेक जन ओळखत सुद्धा नसल्याचे पाहत एकमेकांकडे पाहत कोण आहेत ? तिकडे कुठे निघाले म्हणत प्रश्नाचा भडीमार देखील सुरू करतात. मग रंग लावण्यासाठी जेव्हा पुढे आल्यावर तुम्ही सगळे म्हणत रंग खेळण्यात दंग होतात. कर्जत तालुका पत्रकार संघाचे सदस्य गणेश जेवरे, सुभाष माळवे, मुन्ना पठाण, मोतीराम शिंदे, आशिष बोरा आणि डॉ अफरोजखान पठाण यांनी प्रत्येक शासकीय कार्यलयात जात अधिकारी-कर्मचाऱ्याना नैसर्गिक रंग लावत रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. सकाळी पत्रकार कट्टयावर नगरसेवक अभय बोरा, भाऊसाहेब तोरडमल आणि अमृत काळदाते देखील पत्रकारांबरोबर रंग खेळण्यात दंग झाले होते.