स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२ प्रदान

स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२ प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी) दि.११ मार्च- येथील स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शिंदे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२ प्रदान पुणे येथील एसपी महाविद्यालयाजवळील श्री उद्यान सभागृहात प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांच्या हस्ते व साहित्यिक रमेश आव्हाड, विशाखापट्टणमचे इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे. सानिपीना राव यांच्या उपस्थितीत स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांनी स्वीकारला.
मागील अनेक वर्षांपासून स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सामाजिक जाणीवेतुन मागील कोरोना काळात त्यांनी पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क वाटप केले. वृक्षारोपण, गोरगरिबांना छत्री वाटप केले. यामाध्यमातून ते सतत सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने गौरव करून हा पुरस्कार प्रदान केला. सन्मानचिन्ह, शाल, फेटा, मेडल आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी आकाश निऱ्हाळी, सचिन पेंडुरकर, संकेत शेलार उपस्थित होते. या पुरस्कारा बद्दल समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्या वर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*********
पुरस्कारामुळे सामाजिक काम करण्यास प्रेरणा मिळेल
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त होणे म्हणजे जबाबदारी अजून वाढली आहे. या पुरस्कारामुळे सामाजिक काम करण्यास प्रेरणा मिळेल. मनुष्य सेवा हीच ईश्वसेवा या भावनेने वंचित घटकातील नागरिकांसाठी काम करत राहू अशी प्रतिक्रिया स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी दिली.