महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान: तहसीलदार आगळे

कर्जत प्रतिनिधी : दि ८
जागतिक महिला दिनानिमित्त कर्जत महसुल प्रशासनातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सन्मान करीत शुभेच्छा दिल्या. यासह मिशन वात्सल्य लाभार्थ्याना कोणत्या शासकीय योजनेचा लाभ तात्काळ देता येईल यासाठी रेहकुरी आणि वालवड महिला लाभार्थ्याच्या घरी भेट देत त्याचा आढावा घेतला.
८ मार्च जागतिक महिला दिनानिम्मित महसुल प्रशासनातील महिला तलाठी आणि कर्मचाऱ्याचा कर्जत महसुल विभागाच्यावतीने तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, प्रकाश बुरुंगले, निवडणूक शाखेचे प्रकाश मोरे यांनी सन्मान करीत शुभेच्छा दिल्या. यासह दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख बबन श्रीरंग गाडेकर यांच्या मृत्यु झाल्याने त्यांच्या वारस पत्नीस राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत २० हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार आगळे यांनी महिला दिनाचे औचित्य साधत सुपूर्द केला. यासह कायमस्वरूपी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तींना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ तात्काळ मिळावा. त्या लाभार्थींना शासकीय कोणत्या योजनेचा लाभ तात्काळ उपलब्ध करीत आधार मिळेल यासाठी तहसीलदार नानासाहेब आगळे आणि एकात्मिक बालविकास विभागाचे प्रमुख प्रशांत मिटकरी यांनी कर्जत तालुक्यातील रेहकुरी आणि वालवड येथील मांडगे व अवचर कुटुंबाची भेट घेत या योजनेची कुटुंबास माहिती देत त्यांना लाभ देण्याचे जागतिक महिला दिनानिमित्त आश्वासित केले.
****** शाळा-महाविद्यालयात महिला दिनाचा जागर
कर्जत शहर आणि तालुक्यातील शाळा- महाविद्यालयात महिला दिनाचा जागर करण्यात आला. शाळेत विविध नारी शक्ती वेषभूषेत विद्यार्थीनीनी लक्ष वेधत त्यांच्या कार्याचा इतिहास महिला दिनानिम्मित उपस्थितांसमोर व्यक्त केला. यासह नितीन देशमुख या सर्व सामाजिक संघटना श्रमप्रेमींनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिम्मित माझी वसुंधरा “लेकीचे झाड” या अभियानात सहभाग घेत वृक्षारोपण केले.