महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार कडाडले! काय म्हणाले ते पहा

अहमदनगर दि. 8 मे (प्रतिनिधी )
नरेंद्र मोदी म्हणतात डॉ. बाबासाहेब असते तरी सुद्धा संविधान बदलता आले नसते, अरे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर तू पंतप्रधान झालाच नसता: दिपकभाई केदार
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघांचे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ), काँग्रेस,गट, शिवसेना (उ.बा. ठा.),गट, ऑल इंडिया पॅन्थर सेना, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची विजय निर्धार सभा नुकतीच नगरमध्ये आयोजित केली होती. यावेळी बोलतांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार बोलतांना म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणतात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तरी सुद्धा संविधान बदलता आले नसते, अरे बाबा पण डॉ. बाबासाहेब असते तर तू पंतप्रधान झालाच नसता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचविण्यासाठी आदरणीय शरदचंद्र अहोरात्र झटत आहेत. त्यांचे हाथ बळकट करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर सभेत नमूद केले. या जाहीर सभेला काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर,माजी गृहमंत्री अनिल देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र (तात्या ) फाळके,माजी महापौर आभिषेक कळमकर, किरण काळे,जेष्ठ नेते अशोक गायकवाड, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना केदार म्हणाले आपले अस्तित्व वाचवायचे असेल तर, इंडिया आघाडीला साथ द्या, ही निवडणूक अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आहे. संविधान वाचविन्याच्या लढाईला आम्ही पाठिंबा देत असल्याचे त्यानी स्पष्ट करत.
“सुजय विखे आता पडलेत फिके निवडून येणात निलेश लंके” तुतारीला मतदान करा, आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना खासदार म्हूणन दिल्लीत पाठवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.